शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनी ‘पाटबंधारे’त फायली भिरकावल्या, ‘म्हैसाळ’चा पाणी प्रश्न पेटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 23:35 IST

सांगली : मालगाव (ता. मिरज) येथे पाणी टंचाई असून, द्राक्षबागाही वाळू लागल्यामुळे मालगावातील शेतकऱ्यांनी शनिवारी सांगली (वारणाली) येथील ताकारी-म्हैसाळ उपसा सिंचन व्यवस्थापन कार्यालयात येऊन कार्यकारी अभियंता सुर्यकांत नलवडे यांना जाब विचारत कार्यालयातील फायली भिरकावून दिल्या. अधिकारी आणि शेतकºयांमध्ये वादावादी झाली. संजयनगर पोलीस ठाण्याचा फौजफाटा आल्यानंतर शेतकरी आणि अधिकाऱ्यांतील वादावर पडदा ...

ठळक मुद्देमालगावमधील आंदोलक-अधिकाऱ्यांत जुंपली;पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर वादावर पडदा

सांगली : मालगाव (ता. मिरज) येथे पाणी टंचाई असून, द्राक्षबागाही वाळू लागल्यामुळे मालगावातील शेतकऱ्यांनी शनिवारी सांगली (वारणाली) येथील ताकारी-म्हैसाळ उपसा सिंचन व्यवस्थापन कार्यालयात येऊन कार्यकारी अभियंता सुर्यकांत नलवडे यांना जाब विचारत कार्यालयातील फायली भिरकावून दिल्या. अधिकारी आणि शेतकºयांमध्ये वादावादी झाली. संजयनगर पोलीस ठाण्याचा फौजफाटा आल्यानंतर शेतकरी आणि अधिकाऱ्यांतील वादावर पडदा पडला.पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी कुणावरही गुन्हा दाखल केला नसल्याचे सांगितले. मालगावच्या शेतकऱ्यांनीही सुमारे सात लाख रुपये जमा केले आहेत.

मात्र वेळेत पाणी मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. द्राक्षबागांच्या छाटण्या सुरू आहेत. बागा फुलण्यासाठी सध्या पाण्याची गरज आहे. पाणी वेळेत न मिळाल्यास बागा वाया जाऊन शेतकºयांचे कोट्यवधीचे नुकसान होणार आहे. शासनाकडून निधी मिळाल्यानंतरही शेतकऱ्यांना व्यवस्थित पाणी मिळत नाही. यामुळे मालगाव परिसरातील शेतकरी अस्वस्थ होते. पाणी वाटपाची जबाबदारी योजनेच्या अधिकाºयांकडे असताना ते नदीजवळील योजनेच्या लाभक्षेत्रातील शेतकºयांना योजनेच्या पाण्यापासून वंचित ठेवून जतकडे पाणी नेण्याच्या नियोजनात गुंतले आहेत.

कळंबी शाखा कालव्यात पाणी सोडले असले तरी, अधिकाºयांच्या नियोजनाअभावी पाणी पुढे सरकत नाही. पैसे भरूनही वेळेत पाणी मिळत नसल्याने शेतकºयांनी यापूर्वी दोनवेळा म्हैसाळ योजनेच्या अधिकाºयांची भेट घेऊन जाब विचारला. यावेळी पाण्याची उपलब्धता नसल्याने सध्या कळंबी शाखा कालव्यात पाणी सोडण्यात अडचणी असल्याची जुजबी उत्तरे अधिकारी देत होते. तसेच सध्या वारणेतून पाणी सोडण्यात आले अहे. मंगळवार, दि. १६ एप्रिलपर्यंत मालगावपर्यंत पाणी पोहोचेल, असे आश्वासन दोन्हीवेळा अधिकाºयांनी दिले असले तरी, अधिकाºयांचे ढिसाळ नियोजन व पाणी सोडण्याबाबत दिल्या जाणाºया खोट्या अश्वासनांच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी गाव बंदचा निर्णय घेतला होता. तरीही ताकारी-म्हैसाळ उपसा सिंचन व्यवस्थापन कार्यालयाकडून मालगाव परिसरात पाणी सोडले जात नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती.मालगाव येथील चाळीसहून अधिक शेतकऱ्यांनी शनिवारी दुपारी साडेबारा वाजता सांगली येथील वारणालीमधील ताकारी-म्हैसाळ उपसा सिंचन व्यवस्थापन कार्यालयात येऊन अधिकारी आणि कर्मचाºयांना पाणी टंचाईबाबत जाब विचारला. अधिकारी उडवा-उडवीची उत्तर देऊ लागल्यामुळे त्यांनी कार्यालयातील फायलीच भिरकावल्या. कागदपत्रे सर्वत्र फेकल्यामुळे अधिकारी-कर्मचाºयांमध्ये तणावाचे वातावरण होते. अखेर अधिकाºयांनी संजयनगर पोलीस स्टेशनला कल्पना दिल्यानंतर पोलीस निरीक्षक रमेश भिंगारदिवे हे पोलिसांची कुमक घेऊन हजर झाले.त्यांनी शेतकऱ्यांना शांत करून शांततेच्या मार्गाने मागण्या करण्याची विनंती केली. त्यानंतर आंदोलक शेतकरी तेथून निघून गेले. दरम्यान, या गोंधळाबद्दल पाटबंधारे विभागाच्या अधिकाºयांनी कुणावरही गुन्हा नोंद केला नसल्याचे सांगण्यात आले.शेतकऱ्यांनी संयम ठेवावा : नलवडेताकारी-म्हैसाळ उपसा सिंचन व्यवस्थापन विभागाचे कार्यकारी अभियंता सूर्यकांत नलवडे यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की, म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे पाणी सर्व शेतकºयांना देण्याचा आमचा प्रयत्न आहे. सर्वच शेतकºयांनी पैसे भरले असल्यामुळे प्रत्येकाला पाणी दिले जाणार आहे. तरीही मालगाव येथील प्रदीप सावंत यांच्यासह चाळीस शेतकºयांनी वारणाली येथील आमच्या कार्यालयात येऊन धिंगाणा घातला आहे. फायली भिरकावल्या असून, कार्यालयाचे नुकसानही केले आहे. पाणी टंचाई सर्वत्र असून, शेतकऱ्यांनी संयमाने आंदोलन केले पाहिजे. शेतकºयांचे आंदोलन असल्यामुळे कुणावरही गुन्हा दाखल केला नाही, असेही त्यांनी सांगितले.