शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

वाळव्यातील शेतकरी मराठवाडा दौऱ्यावर

By admin | Updated: May 30, 2016 00:49 IST

दुष्काळग्रस्तांना दिलासा देणार : पाणी, शेतीविषयक जागृती करणार

इस्लामपूर : दुष्काळाने होरपळत असणाऱ्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांना धीर देण्याबरोबरच, पाणी, शेती, जमीन, मातीबद्दल अधिक जाणीव-जागृती करण्यासाठी राजारामबापू पाटील सह़ साखर कारखान्याने आपल्या कार्यक्षेत्रातील गावा-गावातील ८५ शेतकऱ्यांना तीन दिवसांसाठी मराठवाड्यात पाठविले आहे़ माजी मंत्री, आमदार जयंत पाटील हे मराठवाड्याचा दौरा करून आल्यानंतर त्यांनी राजारामबापू सह़ साखर कारखान्याचे अध्यक्ष पी़ आऱ पाटील यांना ही सूचना केली होती़ राजारामबापू सह़ साखर कारखान्याचे उपाध्यक्ष विजयबापू पाटील, कार्यकारी संचालक आऱ डी़ माहुली यांनी शेतकरी व अधिकाऱ्यांना निरोप दिला़ आपणास कृष्णामाईचे वरदान लाभले आहे़ माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांनी ३0-३२ वर्षापूर्वी आपल्या शिवारात पाणी आणल्याने आपणास दुष्काळाच्या झळा कमी बसल्या़ निसर्गाची साथ न मिळाल्याने मराठवाड्यातील शेतकरी बांधव मोठ्या अडचणीत आला आहे़ दुष्काळाच्या संकटाने हैराण झालेल्या या आपल्या शेतकरी बांधवांना आधार द्या. कडक उन्हाळ्यात तेथील शेतकरी कसा जगतो, पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचे मोठे दुर्भिक्ष्य असतानाही तेथील शेतकरी उपलब्ध पाण्याचा पिण्यासाठी व शेतीसाठी कसा वापर करतो, हे बघा, असा संदेश विजयबापू पाटील व आऱ डी़ माहुली यांनी शेतकऱ्यांना दिला़ राजारामबापू सह़ साखर कारखान्याचे शेतकरी व अधिकारी पंढरपूर, उस्मानाबाद, परळी, बीड, जामखेड परिसरातील शेतकऱ्यांशी संवाद साधत तेथील तापमान, शेती, पीकपध्दती, पाण्याचे दुर्भिक्ष्य, पाण्याचे स्रोत, पावसाचे प्रमाण आदी बाबींची माहिती घेणार आहेत़ हा दौरा तीन दिवसांचा आहे़ याप्रसंगी व्यवस्थापकीय अधिकारी व्ही़ बी़ पाटील, शेती विभागाचे गटाधिकारी नितीन पाटील, संग्राम पाटील, महेश कदम, क्लार्क विजय कुलकर्णी, तसेच बोरगावचे टी़ आऱ सलगर, नागावचे सुनील पाटील यांच्यासह कार्यकर्तेल पदाधिकारी, शेतकरी, ग्रामस्थ आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)मराठवाड्याच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर निघालेल्या वाळवा तालुक्यातील शेतकरी व अधिकाऱ्यांना राजारामबापू कारखान्याचे उपाध्यक्ष विजयबापू पाटील, आऱ डी़ माहुली, व्ही़ बी़ पाटील यांनी निरोप दिला.