शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

जमीन अधिग्रहणाविरुध्द शेतकरी न्यायालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2017 23:44 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमिरज : रत्नागिरी-नागपूर राष्टÑीय महामार्गासाठी नियमबाह्य जमीन अधिग्रहणाच्या तक्रारींची मिरज प्रांताधिकारी व प्रकल्प संचालकांकडून दखल घेतली जात नसल्याने मालगाव, टाकळी परिसरातील शेतकºयांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे. महामार्गासाठी जमीन अधिग्रहणाचे काम थांबविण्याच्या मागणीसाठी शेतकºयांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.रत्नागिरी-नागपूर महामार्गासाठी २०१३ मध्ये सर्वेक्षणाचे काम पूर्ण होऊन प्रकल्प अहवाल पाच ...

लोकमत न्यूज नेटवर्कमिरज : रत्नागिरी-नागपूर राष्टÑीय महामार्गासाठी नियमबाह्य जमीन अधिग्रहणाच्या तक्रारींची मिरज प्रांताधिकारी व प्रकल्प संचालकांकडून दखल घेतली जात नसल्याने मालगाव, टाकळी परिसरातील शेतकºयांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे. महामार्गासाठी जमीन अधिग्रहणाचे काम थांबविण्याच्या मागणीसाठी शेतकºयांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.रत्नागिरी-नागपूर महामार्गासाठी २०१३ मध्ये सर्वेक्षणाचे काम पूर्ण होऊन प्रकल्प अहवाल पाच पर्यायांसह राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणाला सादर झाला. याबाबत जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली जनसुनावणी होऊन हरकतींचा विचार करून जिल्हाधिकारी व राष्टÑीय महामार्गाचे प्रकल्प संचालकांच्या संमतीने तांत्रिकदृष्ट्या योग्य असलेला पर्याय स्वीकृत करण्यात आला. या पर्यायाप्रमाणे जमीन अधिग्रहण होईल, अशी खात्री असल्याने या भागातील शेतकºयांनी सर्वेक्षण झालेले क्षेत्र सोडून राहण्यासाठी घरे, विहिरी, शेततळी काढली. काही शेतकºयांनी राष्टÑीय महामार्ग प्राधिकरण महामार्गाच्या नकाशाबाबत माहिती देत नसल्याने प्राधिकरणकडे माहिती अधिकाराखाली माहिती घेतली. पूर्वी संमत केलेल्या नकाशाऐवजी महामार्गासाठी वेगळ्या नकाशाप्रमाणे मोजणी व अधिग्रहण सुरू आल्याची शेतकºयांची तक्रार आहे. प्राधिकरणाच्या अधिकाºयांनी काही राजकीय लोकांच्या फायद्यासाठी जनसुनावणीमध्ये मान्य केलेले पाच पर्याय सोडून अनपेक्षित पर्याय निश्चित केल्यामुळे शेतकºयांची ४२ घरे, डीएसकेसारखे शोरूम व अन्य एक औद्योगिक कारखाना या चुकीच्या पर्यायामुळे बाधित होतात. तत्कालीन प्रकल्प संचालक सुरेंद्रकुमार यांनी चुकीचे काम होऊ देणार नाही, असे आश्वासन दिले; मात्र मोजणी व अधिग्रहणाचे काम पुढे सुरू ठेवल्याने ५५ शेतकºयांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. मालगाव, टाकळी परिसरातील अनिल गुळवणे, सुनील गुळवणे, बाळासाहेब कोरे, गणेश दुर्गाडे, विजय दुर्गाडे, बाळासाहेब लांडगे, गोविंद लांडगे, संजय मेंढे, बबन मेंढे यांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे.