किसानविरोधी तीन काळे कायदे मागे घ्या, शेतीमालाला हमीभाव मिळण्यासाठी कायदा करा, स्वामिनाथन आयोग लागू करा, त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या व ग्रामस्थांच्या स्थानिक मागण्या राज्य महामार्गबाधित शेतकऱ्यांच्या फेरसर्व्हेच्या व नव्याने बाधित होणाऱ्यांचा निवाडा नोटीस तातडीने द्या, शिरढोण ग्रामपंचायतीकडून होणाऱ्या क्षारयुक्त पाणीपुरवठा बंद करून त्वरित गोड पाणी पुरवठा सुरू करावा, यासह अन्य मागण्यांसाठी चक्का जाम आंदोलन करण्यात आले.
किसान सभेचे जिल्हा सरचिटणीस दिगंबर कांबळे, महादेव माळी, सरपंच अशोक मंडले, माणिक पाटील, शामराव पाटील आदींसह मान्यवरांचे भाषण झाले. यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अशोक माने, बाळासाहेब पाटील, सागर पाटील, नितीन पाटील, अमित पाटील, विनायक सूर्यवंशी, रजनीकांत पाटील, वसंत कदम उपस्थित होते.
फोटो-०६शिरढोण१
फोटो ओळ : शिरढोण (ता. कवठेमहांकाळ) येथे संयुक्त किसान मोर्चाच्यावतीने ‘चक्का जाम’ आंदोलन करण्यात आले.