शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

ं‘म्हैैसाळ’च्या बिलाचा भार शेतकºयांवरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 01:08 IST

सदानंद औंधे ।लोकमत न्यूज नेटवर्कमिरज : पाऊस नसल्याने टंचाई निधीतून वीजबिल भरून म्हैसाळसह ताकारी, टेंभू या सिंचन योजना सुरू करण्याच्या जिल्ह्यातील आमदारांच्या मागणीबाबत मुख्यमंत्र्यांनी टंचाई निधीतून वीजबिल भरण्याचे आश्वासन देत म्हैसाळचे आवर्तन सुरू केले; मात्र केवळ पिण्यासाठी मोफत पाणी सोडण्यात येत असून, म्हैसाळ योजनेच्या पाणीबिलाची शेतकºयांकडून वसुली करण्यात येणार आहे.शेतीसाठी ...

सदानंद औंधे ।लोकमत न्यूज नेटवर्कमिरज : पाऊस नसल्याने टंचाई निधीतून वीजबिल भरून म्हैसाळसह ताकारी, टेंभू या सिंचन योजना सुरू करण्याच्या जिल्ह्यातील आमदारांच्या मागणीबाबत मुख्यमंत्र्यांनी टंचाई निधीतून वीजबिल भरण्याचे आश्वासन देत म्हैसाळचे आवर्तन सुरू केले; मात्र केवळ पिण्यासाठी मोफत पाणी सोडण्यात येत असून, म्हैसाळ योजनेच्या पाणीबिलाची शेतकºयांकडून वसुली करण्यात येणार आहे.शेतीसाठी टंचाई निधीतून बिल भरण्याचे आश्वासन देणाºया मुख्यमंत्र्यांनी शेतकºयांच्या तोंडाला पाने पुसल्याचा आरोप काँग्रेस व राष्टÑवादी नेत्यांनी केला आहे. पावसाळ्यात पाऊस नसल्याने द्राक्ष, ऊस व पेरणी झालेल्या पिकांना पाणीटंचाई जाणवू लागल्याने आॅगस्ट महिन्यात म्हैसाळचे आवर्तन सुरू करण्याची शेतकºयांची मागणी होती. टंचाई निधीतून वीजबिल भरून म्हैसाळ, ताकारी व टेंभू योजना सुरू करण्याच्या जिल्ह्यातील आमदारांच्या मागणीबाबत मुंबईत बैठक होऊन मुख्यमंत्र्यांनी म्हैसाळ, ताकारी व टेंभू या सिंचन योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला. २८ कोटी वीजबिल थकीत असल्याने म्हैसाळ योजनेचा विद्युत पुरवठा खंडित होता. गतवर्षी टंचाई परिस्थितीमुळे तीन साखर कारखान्यांनी तीन कोटी रुपये व शेतकºयांनी ३० लाख रुपये जमा केल्यामुळे म्हैसाळ योजना सुरू झाली होती.यावर्षी म्हैसाळच्या आवर्तनासाठी टंचाई निधीतून थकीत वीजबिल भरण्याच्या आश्वासनामुळे शेतकºयांना दिलासा मिळाला. एक महिन्यापूर्वी मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने महावितरणने विद्युत पुरवठा सुरू केल्यानंतर म्हैसाळचे आवर्तन सुरू करण्यात आले. म्हैसाळ योजनेच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या मिरज व कवठेमहांकाळ तालुक्यातील बागायती पिकांना पाणी उपलब्ध झाले; मात्र म्हैसाळच्या वीजबिलाची थकबाकी टंचाई निधीतून भरण्यात आलेली नसून, शेतकºयांकडून पाणीपट्टी वसुलीसाठी पिकांची मोजणी सुरू करण्यात येणार असल्याचे म्हैसाळच्या अधिकाºयांनी सांगितले. म्हैसाळचे आवर्तन पुढे सुरू ठेवण्यासाठी शेतकºयांकडून पाणीपट्टी वसुली मोहीम सुरू करण्यात आली असून, सुमारे २५ लाख रुपये जमा झाले आहेत. टंचाई निधीतून थकीत वीजबिल न भरता मिरज, कवठेमहांकाळ व जत तालुक्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई असलेल्या ठिकाणी म्हैसाळचे पाणी सोडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.डोंगरवाडी योजना : पाणी सोडण्याची मागणीम्हैसाळचे आवर्तन सुरू होऊन महिना झाल्यानंतरही म्हैसाळ योजनेवरील डोंगरवाडी उपसा सिंचन योजनेतून पाणी सोडण्यात आले नसल्याने डोंगरवाडी, कळंबी, सिध्देवाडी, पाटगाव, सोनी, भोसे, करोली-एम, खंडेराजुरी, गुंडेवाडी ही गावे म्हैसाळच्या पाण्यापासून अद्याप वंचित आहेत. डोंगरवाडीचे पाणी सोडण्यासाठी कळंबी, सोनी, भोसे परिसरातील शेतकºयांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. डोंगरवाडी योजनेच्या जलवाहिनीचे काम सुरू असल्याने डोंगरवाडी योजनेतून अद्याप पाणी सुरू करण्यात आले नसल्याचे म्हैसाळच्या अधिकाºयांनी सांगितले.