शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

सांगलीत २२ रोजी शेतकरी एल्गार मेळावा

By admin | Updated: July 14, 2017 23:04 IST

सांगलीत २२ रोजी शेतकरी एल्गार मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : राज्य शासनाने कर्जमाफीच्या आदेशामध्ये अनेक त्रुटी ठेवून शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. म्हणूनच या शेतकऱ्यांना शंभर टक्के कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीची जनजागरण यात्रा दि. २२ रोजी सांगलीत येणार आहे. यानिमित्ताने सांगलीतील मराठा सेवा संघाच्या कार्यालयात दि. २२ रोजी सकाळी १० वाजता शेतकरी एल्गार मेळावा घेण्यात येणार आहे, अशी माहिती कामगार व हमाल चळवळीचे ज्येष्ठ नेते बापूसाहेब मगदूम यांनी दिली.विविध शेतकरी संघटनांची शुक्रवारी सांगलीत बैठक झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते बापूसाहेब मगदूम होते. यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीच्यावतीने महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे, स्वामिनाथन् आयोगाच्या शिफारशी लागू झाल्या पाहिजेत, या मागण्यांसाठी जनजागरण यात्रा सुरु आहे. ही यात्रा दि. २२ जुलैस सांगलीत येणार आहे. त्यानिमित्ताने सांगलीत मेळावा आयोजित केला आहे. त्याच्या तयारीसाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात शेतकऱ्यांची जनजागृती करून सांगलीतील मेळावा यशस्वी करणार आहे. सोमवारपासून तालुकानिहाय कार्यकर्त्यांच्या बैठका घेणे, ध्वनिक्षेपकावरून प्रचार करणे, गाववार बैठका घेऊन प्रचार करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला आहे. सोमवारी मिरज पूर्व भागातील कार्यकर्त्यांची आरग येथे बैठक, सायंकाळी कवठेमहंकाळ येथे, तर रात्री शिरढोण येथे बैठक होणार आहे. मंगळवारी कवठेएकंद (ता. तासगाव), पलूस, कडेगाव, विटा, आटपाडी, इस्लामपूर व शिराळा येथेही बैठका घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. कॉम्रेड उमेश देशमुख यांनी प्रास्ताविक केले, अ‍ॅड्. के. डी. शिंदे यांनी आभार मानले.यावेळी कॉ. रमेश सहस्त्रबुध्दे, सुमन पुजारी, शशिकांत गायकवाड, विकास मगदूम, सुभाष पवार, अशोक खाडे, सचिन पाटील, तुळशीराम गळवे, सम्मेद पाटील, कॉ. दिगंबर कांबळे, नितीन महिंद, विकास भोसले आदी बैठकीस यावेळी उपस्थित होते.सरकारविरोधात लढणार : देशमुखशासनाने कर्जमाफीच्या निर्णयात शेतकऱ्यांना फसविले आहे. शासनाने कर्जमाफीसाठी ठरवलेल्या निकषामुळे गरजू शेतकरी लाभापासून वंचित राहत आहेत. कर्जाची फिरवाफिरवी केलेला शेतकरी वंचित राहत आहे. दीड लाखापेक्षा जास्त कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना वरची रक्कम अगोदर भरण्यास सांगितले जात आहे. पाऊस लांबल्यामुळे दुबार पेरणीचे संकट डोक्यावर आहे. त्यामुळे शेतकऱ्यास यातून बाहेर काढण्याची गरज असताना, सरकार त्यांची परीक्षा पाहत आहे. शेतकरी आता हारणार नाही, तर हातात रूमण घेऊन सरकारच्या विरोधात लढणार आहे, असा इशाराही कॉम्रेड उमेश देशमुख यांनी दिला.