लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : सांगली नाट्य परिषदेतर्फे भावे नाट्यगृहात एकांकिका महोत्सव आयोजित करण्यात आला. हेल्पिंग बडीज फाऊंडेशनची ‘इमोशन्स बाय दी वे’ आणि समांतर व शांतिनिकेतनची ‘समांतर’ या एकांकिका सादर झाल्या.
महोत्सवाचे उदघाटन महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी केले. यावेळी अरुण दांडेकर, नाट्य परिषदेच्या उपाध्यक्षा अंजली भिडे, भालचंद्र चितळे, सनित कुलकर्णी, विशाल कुलकर्णी, मुकुंद पटवर्धन, सांगली नाट्य परिषदेचे अध्यक्ष श्रीनिवास जरंडीकर, हरिहर म्हैसकर, जुई बर्वे, प्रा. डाॅ. भास्कर ताम्हणकर, चंद्रकांत धामणीकर आदी उपस्थित होते. इमोशन्स बाय दी वे एकांकिकेमध्ये मुख्य भूमिका डॉ. विकास व डॉ. जया कुऱ्हेकर यांनी साकारल्या. लेखन व दिग्दर्शन वरुण जाधव यांनी केले होते. नेपथ्य ॲड. गणेश भोई, पद्मा गर्ग, स्वाती गौड यांनी केले. प्रकाश योजना शशांक लिमये यांची होती. समांतरचे दिग्दर्शन धनश्री गाडगीळ व लेखन इरफान मुजावर यांनी केले होते. विविध भूमिका मयुरेश पाटील, धनश्री गाडगीळ, वैष्णवी शेटे, मयुर पाटील यांनी केल्या. नेपथ्य विक्रांत जावडेकर, पार्श्वसंगीत अथर्व म्हेत्रे, प्रकाश योजना इरफान मुजावर यांचे होते.