शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

कौटुंबिक कलहातून सावर्डेत आईची दोन मुलांसह आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 00:28 IST

तासगाव : सावर्डे (ता. तासगाव) येथे कौटुंबिक वादातून विवाहितेने आपल्या दोन मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. चंदाराणी बाळासाहेब ...

तासगाव : सावर्डे (ता. तासगाव) येथे कौटुंबिक वादातून विवाहितेने आपल्या दोन मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. चंदाराणी बाळासाहेब सदाकळे (वय २७), अभिराज बाळासाहेब सदाकळे (७) व हिंदुराज बाळासाहेब सदाकळे (३) अशी मृतांची नावे आहेत.ही घटना रविवारी सकाळी दहा वाजता उघडकीस आली. घटनेची नोंद तासगाव पोलिसांत झाली आहे. चंदाराणीचा दहा वर्षांपूर्वी बाळासाहेब याच्याशी विवाह झाला होता. मृत अभिराज व हिंदुराज यांच्यासह त्यांना हर्षद (वय ९) अशी तीन मुले होती. बाळासाहेब हा काही काळ दुसऱ्याच्या किराणा दुकानात कामास होता. सध्या त्याने गावात स्वत:ची बेकरी सुरू केली आहे.जोडधंदा म्हणून एका चारचाकी गाडीतून शाळेच्या मुलांना सोडण्याचे काम करीत आहे. त्यातूनच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो; मात्र किरकोळ कारणावरून बाळासाहेब व चंदाराणी यांच्यात नेहमी भांडणे व्हायची. बुधवार, दि. ८ रोजी सायंकाळी साडे सात वाजता त्यांच्यात वादावादी झाली. यानंतर चंदाराणी रागाच्याभरात अभिराज व हिंदुराज यांना घेऊन घरातून निघून गेली.त्यानंतर घरातील सर्वांनी त्यांची सर्वत्र शोधाशोध केली; मात्र ते सापडले नाहीत. शेवटी बाळासाहेब सदाकळे यांनी शुक्रवार, दि. १० रोजी तासगाव पोलिसांत पत्नी व दोन मुले बेपत्ता असल्याची तक्रार दिली. रविवारी गावातील लोढे रस्त्यावरील दिलीप पाटील यांच्या पडक्या विहिरीत चंदाराणी, अभिराज व हिंदुराज यांचे मृतदेह आढळून आले.या घटनेनंतर संपूर्ण सावर्डे गाव सुन्न झाले. तिघांचे मृतदेह पाहताच पती बाळासाहेब, मुलगा हर्षद यांच्यासह सदाकळे कुटुंबियांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.हर्षद वाचला...बुधवारी सायंकाळी हर्षद बाजारात गेला होता. त्याचवेळी घरी भांडण झाले आणि चंदाराणी रागाच्याभरात घरातून निघून गेली. जाताना अभिराज आणि हिंदुराज यांना घेऊन गेली. जर हर्षद घरी असता तर, त्यासही ती घेऊन गेली असती; पण तो वाचला.हातात हात...चंदाराणीला आलेला क्षणाचा राग हा तिघांच्या मृत्यूचे कारण ठरला. अभिराज आणि हिंदुराज यांचे मृतदेह एकमेकांच्या हातात हात घालून तरंगत होते. हे दृश्य पाहून अनेकांच्या काळजाचे पाणी पाणी झाले.