शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

थकबाकी भरूनही ‘बनेवाडी’ बंदच

By admin | Updated: March 23, 2016 00:44 IST

शेतकरी पाण्याच्या प्रतीक्षेत : योजना अडकली तांत्रिक बिघाडाच्या गर्तेत

लखन घोरपडे :: देशिंग ::कवठेमहांकाळ तालुक्याच्या पश्चिम विभागातील भागाला पाणी देण्यासाठी म्हैसाळ योजनेपासून कार्यान्वित करण्यात आलेली बनेवाडी उपसा सिंचन योजना तांत्रिक बिघाडाच्या गर्तेत अडकली आहे. शेतकऱ्यांनी पैसे भरून तब्बल आठ दिवस झाले तरीही, पाटबंधारे विभागाकडून योजना चालू करण्यात आलेली नाही.दरम्यान, खरशिंग, बनेवाडी या गावांतील शेतकऱ्यांनी तब्बल तीन लाख रूपये गोळा करून मागील आठवड्यात सोमवार दि. १४ रोजी ही रोख रक्कम पाटबंधारे विभागाचे अधिकारी नलवडे यांच्याकडे सुपूर्द केली होती. ही थकबाकीची रक्कम भरताच योजनेच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ उपसा सिंचन चालू करण्याचे आदेश दिले. मात्र यंत्रांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने अद्याप ही योजना बंदच आहे. थकबाकीचे पैसे भरून आठ दिवस होऊनही योजना चालू न झाल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे. तालुक्याच्या पश्चिम भागातील खरशिंग, बनेवाडी, अलकूड, हरोली, देशिंग या परिसरातील ११५० हेक्टर शेतीला या उपसा सिंचन योजनेतून पाणी देण्यात येते. तसेच येथील शेती पावसाव्यतिरिक्त या पाण्यावर अवलंबून आहे. शिवाय पावसाने ओढ दिल्याने पिके वाळून गेली आहेत, तर तलावातील पाणीसाठाही संपुष्टात आला आहे. त्यामुळे पाच गावांसाठी असणारी हरोली तलावातील गाव पाणीपुरवठा योजनाही बंद होत आल्याने, गावांमध्ये चार ते पाच दिवसांतून एकदा पिण्याचा पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी सर्वत्र भटकावे लागत आहे. या परिसरात द्राक्ष तसेच ऊसशेती मोठ्या प्रमाणावर आहे. मात्र पाण्याविना ही शेती वाळून जाण्याच्या मार्गावर असल्याने, उपसा सिंचनची थकित बाकी भरूनही हजारो रूपये खर्चून शेतीला टँकरने पाणी पुरवठा करून शेती वाचविण्याचा प्रयत्न येथील शेतकऱ्यांकडून केला जात आहे. पैसे भरूनही येथील नियोजनशून्य कारभारामुळे गेल्या आठ दिवसांपासून शेतकऱ्यांना फटका बसत आहेमुख्य आवर्तनाचे दिवस संपत आले असल्याने बनेवाडी उपसा सिंचन योजनेतून शेतकऱ्यांना पाणी सुटणार तरी कधी? असा सवाल आता शेतकरी करू लागले आहेत. पैसे भरले, तरीही पाणी नाही तालुक्याच्या पश्चिम विभागाला वरदान ठरणारी बनेवाडी उपसा सिंचन योजना म्हैसाळच्या मुख्य कालव्यात पाणी येऊनही थकबाकीमुळे बंद होती. परंतु या परिसरामध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाल्याने येथील शेतकऱ्यांना पाणी देण्यासाठी बनेवाडी, खरशिंग गावामधील लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन शेतकऱ्यांकडील तब्बल तीन लाखांची रक्कम पाटबंधारे विभागात भरण्यात आली. मात्र पैसे भरूनही योजना बंद असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.गुजरातमधून सुटे भाग येण्यास आणखी दोन दिवसबनेवाडी उपसा सिंचन योजना चालू करण्यासाठी तांत्रिक बिघाड असल्याने, ही योजना चालू करण्यासाठी उपयुक्त असणाऱ्या इलेक्ट्रॉनिक बोर्डमधील पार्ट जळाला असल्याने, तो गुजरात येथून मागविला आहे. हा पार्ट येण्यास आणखी दोन ते तीन दिवस लागणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले .