शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

शेरीनाल्याचे अपयश ‘एमजीपी’मुळे

By admin | Updated: October 16, 2015 00:56 IST

नव्याने प्रस्ताव : दोन नाल्यांचा योजनेत समावेशच नाही

सांगली : शेरीनाला योजनेत कोल्हापूर रोड व गावभागातून येणाऱ्या दोन्ही नाल्यांचा समावेश करण्यात आलेला नाही. शेरीनाला योजनेचा आराखडा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने तयार केलेला होता. ‘एमजीपी’ने या दोन नाल्यांचा विचारच आराखड्यात केला नसल्याने नदीचे प्रदूषण सुरूच आहे. याबाबत स्थायी समितीचे सभापती संतोष पाटील यांनी नाराजी व्यक्त करीत, या दोन्ही नाल्यांतील सांडपाण्याच्या विल्हेवाटीसाठी नवीन प्रस्ताव तयार करण्यात येणार असल्याचे सांगितले. कृष्णा नदीत सांगली शहरातील चार नाले मिसळत आहेत. त्यापैकी कर्नाळ रस्ता व कुपवाड-मीरा हौसिंग सोसायटीमार्गे येणारे नाले वसंतदादा स्मारकाच्या उत्तरेकडून येतात. तसेच खणभाग, गावभागातून वैरण बाजार मार्गे व कोल्हापूर रस्त्याकडील नाला, असे दोन नालेही नदीपात्रात मिसळतात. शेरीनाला योजनेत कर्नाळ रस्ता व मीरा हौसिंग सोसायटीकडून येणाऱ्या दोन नाल्यांचाच विचार करण्यात आला आहे. उर्वरित दोन नाल्यांचा त्यात समावेश नाही. या योजनेवर राष्ट्रीय नदी कृती अभियानातून ३० कोटीपेक्षा अधिक रुपयांचा खर्च करण्यात आला. स्थायी समितीचे सभापती संतोष पाटील यांनी गुरुवारी शेरीनाला योजनेची पाहणी केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, शेरीनाला योजनेसाठी शासनाने महापालिकेवर विश्वास न दाखविता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे काम सोपविले होते. जीवन प्राधिकरणने केवळ दोनच नाल्यांचा विचार करून योजना तयार केली. त्यामुळे नदीचे प्रदूषण पूर्णत: रोखले गेलेले नाही. आता उर्वरित दोन नाल्यांसाठी माईघाटावर सांडपाणी शुद्धीकरण यंत्रणा उभारावी लागेल अथवा हे सांडपाणी हनुमाननगर येथील आॅक्सिडेशन पाँडपर्यंत न्यावे लागणार आहे. तसा प्रस्ताव लवकरच तयार केला जाईल. (प्रतिनिधी)मुहूर्त सापडला : पंपिंग आज सुरूशेरीनाल्याचे पंपिंग शुक्रवारपासून सुरू करण्यात येत आहे. धुळगावमधील ८०० एकर क्षेत्राला शेरीनाल्याचे पाणी दिले जाणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांची सोसायटी स्थापन केली जाईल. त्यामार्फत वितरण व्यवस्थाही तयार करण्याचा प्रयत्न असल्याचेही पाटील म्हणाले.