शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सांगली महापालिकेतील घोटाळ्यांबाबत कारवाई करणार- फडणवीस

By admin | Updated: May 19, 2017 19:48 IST

सांगली महापालिकेत घोटाळे, गैरव्यवहार असतील तर कारवाई करण्यास कचरणार नाही.

ऑनलाइन लोकमतमिरज, दि. 19 - सांगली महापालिकेत घोटाळे, गैरव्यवहार असतील तर कारवाई करण्यास कचरणार नाही. महापालिकेकडे रस्ते हस्तांतरण करण्यासाठी सौदेबाजीचे प्रकार होत असतील, तर त्यावरही कारवाई होईल, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत दिला.सांगली जिल्हा दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री फडणवीस यांनी मिरज शासकीय विश्रामगृहात जिल्हा प्रशासनाची आढावा बैठक घेतली. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, महापालिकेत घोटाळे असतील, लेखापरीक्षणात गैरव्यवहार झाल्याचे आढळले, तर कारवाईला कचरणार नाही. मात्र राजकीय हेतूने कारवाई करणार नाही. दारू दुकानांना संरक्षण देण्यासाठी महापालिकेकडे रस्ते हस्तांतरण करण्याच्या हालचाली सुरू असल्याच्या तक्रारीबाबत ते म्हणाले की, मागील शासनाने २००१मध्ये जेथे पर्यायी रस्ते उपलब्ध आहेत, तेथे राज्य आणि राष्ट्रीय मार्ग महापालिकांना हस्तांतरीत करण्याचा निर्णय घेतला होता. त्या शासन निर्णयाप्रमाणे रस्त्यांचे हस्तांतरण होईल. सरसकट रस्ते हस्तांतरण करण्याचा शासनाचा कोणताही इरादा नाही. रस्ते महापालिकांकडे हस्तांतरीत करण्यासाठी कोणतीही डील किंवा सौदेबाजी होत असेल तरसबंधितांवर कारवाई करण्यात येईल.सांगली जिल्ह्याने भाजपला लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद निवडणुकीत भरभरून दिले आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या विकासाची जबाबदारी आमची आहे. येथील विकास कामांसाठी निधीची कमतरता पडणार नाही. आघाडी शासनात जिल्ह्यातील पॉवरफुल्ल मंत्री असतानाही सांगली जिल्ह्याला निधी मिळाला नव्हता. मात्र गेल्या अडीच वर्षात पूर्वीच्या तुलनेत जादा निधीमिळाल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. ते म्हणाले की, जिल्हा प्रशासनाचे काम चांगले असून ग्रामसडक योजनेचा दर्जा उत्तम आहे. नागरी विभागात स्वच्छ अभियान शंभर टक्के आहे. जिल्ह्यात जलयुक्त शिवाराचे ८० टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले असून कृषी विभागाचे २० टक्के काम अपूर्ण आहे. १५ जूनपूर्वी शंभर टक्के काम पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रशासकीय मान्यतेला उशीर होऊ नये यासाठी पावसाळ्यातच पुढील वर्षातील कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात येईल. जिल्ह्यात गेल्या५० वर्षात झाले नाही, एवढे शौचालयांचे काम गेल्या तीन वर्षात पूर्ण झाले आहे.पोलिसांनी डॉल्बीमुक्तीतून बंधारा ही अभिनय कल्पना साकारली आहे. जिल्ह्यात १५ हजार बेघर कुटुंबांना प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकुल देण्याचे उद्दिष्ट असून यापैकी साडेसहा हजार घरांचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. जिल्हा पूर्णपणे बेघरमुक्त करण्यात येणार आहे. कृषी पंपांची प्रतीक्षा यादी कमी करण्यासाठी सौरपंप देण्यात येणार आहेत, असे त्यांनी सांगितले.टेंभू योजनेसाठी लागणारी १६५ मेगावॅट वीज पूर्णपणे सौरऊर्जेवर मिळविण्यात येणार असून यासाठी जागेचे व्यवस्थापन करण्यात येत आहे. टेंभू योजनेचे पाणी कालव्याऐवजी जलवाहिनीतून देऊन ही योजना पथदर्शी करण्यात येणार आहे.टेंभू योजनेचा खर्च मोठा असल्याने खर्चाच्या तुलनेत उत्पन्न मिळविण्याचा प्रयत्न आहे. ताकारी, म्हैसाळ योजनेला निधी देऊन अपूर्ण कामे पूर्ण करण्यात येणार आहेत. जलयुक्त शिवार योजनेत गैरव्यवहाराची तक्रार असेल तर दोषींवर कारवाई करू, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पालकमंत्री सुभाष देशमुख, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खा. संजय पाटील, आ. सुरेश खाडे, आ. सुधीर गाडगीळ, भाजप जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख उपस्थित होते.जलयुक्तच्या अपूर्ण कामांबाबतअधिकाऱ्यांना खडसावलेमिरज विश्रामगृहात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी जलयुक्त शिवार योजनेच्या अपूर्ण कामांबाबत जिल्हा प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले. कृषी विभाग व जिल्हा परिषदेच्या छोटे पाटबंधारे विभागाची कामे अपूर्ण असल्याने जिल्हा प्रशासनाने कामे पूर्ण करण्याची जबाबदारी घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कामकाजाचा आढावा घेण्यात आला.