विटा : केंद्राने धोरण बदलल्यामुळे साखर कारखान्यांना मंजुरी मिळू शकत नाही. त्यामुळे आम्ही उदगिरी शुगर या खासगी साखर कारखान्याची उभारणी केली. आमच्या सर्वच संस्थांचा कारभार पारदर्शक असून, जास्तीत जास्त ऊस दर देत असल्यामुळे ऊस कमी पडत नाही. मात्र, साखर कारखाने सक्षमपणे चालले पाहिजेत. साखर कारखाने अडचणीत आले तर त्याचा दूरगामी परिणाम ग्रामीण अर्थव्यवस्थेवर होत असल्याचे मत माजी वनमंत्री व आ. डॉ. पतंगराव कदम यांनी व्यक्त केले.बामणी-पारे (ता. खानापूर) येथे उदगिरी शुगरच्या तिसऱ्या गळीत हंगामाचा प्रारंभ व ३० केएलडीपी डिस्टिलरी प्रकल्पाचे उद्घाटन आ. डॉ. कदम यांच्याहस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेते मोहनराव कदम, भारती विद्यापीठ विश्वविद्यालयाचे कुलगुरू डॉ. शिवाजीराव कदम, प्रतापराव साळुंखे, आनंदराव मोहिते, रघुनाथ कदम, महेंद्र लाड उपस्थित होते.कदम म्हणाले, उदगिरी कारखाना काटकसरीने चालला असल्यामुळे कर्जाचे हप्ते वेळेत फेडून ३२ कोटी रूपये एफआरपीपेक्षा जास्त दिले आहेत. बाजारातील साखरेचे दर कमी होऊनही प्रसंगी तोटा सहन करून एफआरपी दिलेली आहे. साखर कारखाने आर्थिकदृष्ट्या सक्षम असतील तर उसाला जादा दर देणे शक्य आहे. सोनहिरा व उदगिरी कारखान्यांची उपपदार्थ निर्मिती असल्यामुळेच एफआरपी देणे शक्य झाले आहे. यावेळी उपाध्यक्ष एन. एस. कदम, डी. ए. माने, प्रा. सयाजीराव पाटील, खोत, भाऊसाहेब यादव, नामदेवराव मोहिते, जयसिंगराव कदम, डॉ. जितेश कदम, सुरेश मोहिते, शहाजी पाटील, जयहिंद साळुंखे, विठ्ठलराव साळुंखे, अशोकराव साळुंखे, नितीन पवार, शशिकांत शिंदे, इंद्रजित साळुंखे, बशीर संदे, महावीर शिंदे, अभिजित शिंदे, धनाजी पाटील उपस्थित होते. बी. एन. संदे यांनी आभार मानले. (वार्ताहर)
कारखान्यांच्या संकटांचा ग्रामीण अर्थव्यवस्थेवर परिणाम
By admin | Updated: October 24, 2015 00:21 IST