शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

जतच्या स्मशानभूमीत सुविधांची वानवा...

By admin | Updated: December 17, 2014 22:51 IST

पालिकेचे दुर्लक्ष : अंत्यसंस्कार करणे जिकिरीचे

जत : येथील हिंदू स्मशानभूमीत मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी बसविण्यात आलेल्या जाळीची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे मृतदेहावर अंत्यसंस्कार करताना अडचणी निर्माण होत आहेत.जत शहराची लोकसंख्या सुमारे चाळीस हजार इतकी आहे. विजापूर ते गुहागर राज्यमार्गालगत जत शहराच्या बाहेर हिंदू स्मशानभूमी आहे. येथे दोन ठिकाणी पत्राशेड आहे. एका पत्राशेडमध्ये मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात येणारी जाळी बसविण्यात आली आहे, पण दुसऱ्या शेडमध्ये जाळी बसविण्यात आलेली नाही. जाळी असल्यामुळे व्यवस्थित लाकडे ठेवून अंत्यसंस्कार करणे सोयीचे होते, तर जाळी नसल्यामुळे लाकडे व्यवस्थित ठेवता येत नाहीत. काहीवेळा मृतदेह अर्धवट जळतात. त्यामुळे मृतदेहाची विटंबना होण्याची शक्यता असते. जाळी नसल्यामुळे मृतदेहावर अंत्यसंस्कार केल्यानंतर मृतदेहाचे पूर्ण दहन होईपर्यंत त्यांच्या नातेवाईकांना स्मशानभूमीत बसून रहावे लागत आहे.स्मशानभूमीच्या सभोवताली दगडी संरक्षक भिंत बांधून त्याला मुख्य प्रवेशद्वार बसविण्यात आले आहे. सतत पाणीपुरवठा व लाईटची व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु काही भुरटे चोर येथील जाळीची रात्री-अपरात्री चोरी करीत आहेत. तसेच काही उपद्रवी लोक पाण्याची पाईपलाईन फोडून पाणीपुरवठा खंडित करीत आहेत. नगरपालिका प्रशासनाने येथे दिवसभर सुरक्षारक्षक नियुक्त करून भुरटे चोर आणि उपद्रवी नागरिकांचा बंदोबस्त करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु रात्री सुरक्षा रक्षक नसल्याने चोरटे रात्री जाळी चोरून नेत होते. नगरपालिका प्रशासनाने यासंदर्भात जत पोलिसात तक्रारही केली आहे. परंतु त्याचा उपयोग झाला नाही.हिंदू स्मशानभूमीच्या समोरच आता नागरी वसाहत तयार झाली आहे. नगरपालिका प्रशासनाने येथे पूर्णवेळ सुरक्षारक्षक नियुक्त करून, मृतदेहांची होत असलेली हेळसांड कमी करावी, अशी मागणी येथील नागरिकांतून होत आहे. (वार्ताहर)