शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

फ. मुं. शिंदे, पतंगरावांच्या टोलेबाजीने रसिकांना गुदगुल्या

By admin | Updated: January 5, 2015 00:34 IST

ज्ञानभारती ग्रंथप्रदर्शन : सांगलीत ग्रंथदिंडी, व्याख्यान उत्साहात

सांगली : खुमासदार आणि खुसखुशीत भाषणबाजीने माजी मंत्री आ. पतंगराव कदम आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फ. मुं. शिंदे यांनी रविवारी ज्ञानभारती ग्रंथप्रदर्शनात रसिकांना गुदगुल्या केल्या. दोन तास रंगलेल्या या उद्घाटन सोहळ््यात हशा आणि टाळ््यांचा गजर झाला. भारती विद्यापीठ शैक्षणिक संकुलाच्यावतीने कच्छी जैन भवन येथे आयोजित ज्ञानभारती शब्दोत्सव २०१५ चे उद्घाटन रविवारी करण्यात आले. पतंगराव व फ. मुं. शिंदेच्या टोलेबाजीने उद्घाटन सोहळ््याला रंगत आली. फ. मुं. शिंदे म्हणाले, ग्रंथाशी आपला संबंध हा शालेय जीवनापासूनच येतो. आपल्याला विविध ज्ञानाची कवाडे खुली करण्याचे कार्य ग्रंथांच्या माध्यमातून करण्यात येते. कित्येकवेळा ग्रंथ आणि आपला आत्मिय संवाद होतो. आपण दोघेच एकमेकांशी बोलत असतो. त्यातूनच आपल्याला ज्ञान मिळते. दिवसामध्ये ठराविक वेळ ग्रंथवाचन केले पाहिजे कारण भाषेच्या माध्यमातूनच आपल्यावर संस्कार होत असतात आणि ते चिरकाल टिकतात. पतंगराव म्हणाले, ग्रंथामध्ये फार मोठी वैचारिक ताकद असते. रशिया, फ्रान्स येथे झालेली क्रांती ही ग्रंथाच्या माध्यमातूनच झालेली आहे. जगात ज्यांनी उत्तुंग यश मिळविले, त्यांचे चरित्र पाहिल्यास त्यांनी प्रचंड वाचन केल्याचेच लक्षात येईल. यावेळी आ. सुधीर गाडगीळ, भारती विद्यापीठ सांगलीचे मानद संचालक डॉ. एच. एम. कदम, त्रिलोकनाथ जोशी, अर्थतज्ज्ञ जे. ए. पाटील, प्राचार्या पूजा नरवाडकर उपस्थित होते. प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे यांनी प्रास्ताविक केले. सायंकाळी केदार फाळके यांचे व्याख्यान झाले. (प्रतिनिधी)