शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

एलईडी पथदिव्यांच्या निविदेला मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:21 IST

सांगली : महापालिकेच्या ६० कोटी रुपयांच्या एलईडी पथदिवे निविदेला शुक्रवारी तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे. आता १५ जूनरोजी ...

सांगली : महापालिकेच्या ६० कोटी रुपयांच्या एलईडी पथदिवे निविदेला शुक्रवारी तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे. आता १५ जूनरोजी निविदा उघडल्या जाणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.

महापालिका क्षेत्रात ३२ हजार पथदिवे आहेत. राज्य शासनाने ईईएसएल या खासगी कंपनीला एलईडी पथदिवे बसविण्याचा ठेका दिला होता. मात्र कंपनीच्या अटी व शर्तींमुळे महापालिकेला पंधरा ते वीस कोटी रुपयांचा बोजा सहन करावा लागणार होता. त्यामुळे ईईएसएल कंपनीपेक्षा कमी दराने एलईडी दिवे बसवून देणार्‍याला ठेका देण्याचा ठराव महासभेने केला. त्यास नगरविकासने मान्यता दिली. त्यानुसार निविदा मागवल्या आहेत. महापालिकेच्या ‘एलईडी पथदिवे’ प्रकल्पासाठी २६ मार्च रोजी निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती. निविदा भरण्याची अंतिम तारीख २२ एप्रिल होती. या मुदतीत केवळ दोनच निविदा दाखल झाल्या. त्यानंतर प्रशासनाने दुसऱ्यांदा मुदतवाढ दिली. या कालावधीत निविदेला प्रतिसाद मिळाला नाही. तीन निविदा आल्याशिवाय त्या उघडता येत नसल्याने प्रशासनाने शुक्रवारी तिसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे. आता १४ जूनपर्यंत निविदा भरण्यास मुदत असून १५ रोजी निविदा उघडली जाणार आहे. एलईडी दिवे बसविल्यानंतर वीज बिलात होणारी बचत रक्कम ठेकेदाराला दिली जाणार आहे. या बचत रकमेतील ५ टक्के रक्कम ठेकेदाराकडून महापालिकेला मिळणार आहे.