शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

विस्तारिकरणाचा प्रश्न ऐरणीवर...

By admin | Updated: November 2, 2014 23:29 IST

सागरेश्वर अभयारण्य : हरणांच्या जीवितास धोका

प्रताप महाडिक - कडेगाव  -यशवंतराव चव्हाण वन्यजीव सागरेश्वर अभयारण्यातील वन्य जीव धोक्यात आहे. अभयारण्य बंदिस्त नसल्यामुळे मोकाट हरणांचा कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्यू होत आहे. हरणांच्या मृत्यूची मालिका अखंडपणे सुरू आहे. याशिवाय येथील मोकाट हरणे शेतकऱ्यांची पिके फस्त करीत आहेत. यावर कायमस्वरुपी उपाययोजना करणे गरजेचे आहे. सागरेश्वर अभयारण्य ते चौरंगीनाथ निसर्ग पर्यटन केंद्रापर्यंतचा वनविभागाच्या हद्दीतील प्रदेश सागरेश्वर अभयारण्यात समाविष्ट करून संपूर्ण अभयारण्य परिसराभोवती तारेचे कुंपण करून हरणे बंदिस्त करणे गरजेचे आहे.सागरेश्वर अभयारण्य परिसरात सध्या मृत्यू होणाऱ्या हरणांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. यास जबाबदार कोण? हा प्रश्न अधांतरीतच आहे. तसेच मोकाट हरणांमुळे परिसरातील शेतीचे नुकसान होत आहे. यामुळे शेतकरी हैराण झाला आहे. वनविभागाकडून दरवर्षी लाखो रुपयांची पीक नुकसानभरपाई शेतकऱ्यांना दिली जाते. हरणे बंदिस्त केल्यावर ही पीक नुकसानभरपाई द्यावी लागणार नाही शिवाय कुत्र्यांच्या हल्ल्यात हरणांचा मृत्यू होणार नाही.अन्न व पाण्याच्या शोधात बाहेर पडलेली हरणे रानोमाळ पिकांची नासाडी करतात. तरीही गांधारीची भूमिका घेतलेले शासन गप्पच आहे. सध्या या हरणांना व वन्यप्राण्यांना बंदिस्त करण्याचा खर्च जास्त आहे.माजी वनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी अभयारण्याच्या सभोवती ३५ किमी लांबीचे कुंपण घालण्यासाठी कोट्यवधींचा निधी गेल्या दोन वर्षांत टप्प्या-टप्प्याने दिला. ३५ किमीपैकी २७ किमी लांबीचे कुंपण झाले परंतु उर्वरित ७ किमी अंतरावरील मोकळ्या जागेतून हरणे बाहेर पडतात. बाहेर पडलेल्या हरणांवर कुत्र्यांचा हल्ला होत आहे. यात हरणांचा मृत्यू होत आहे. मोकाट हरणे पिकांची नासाडी करीत आहेत. शासन शेतकऱ्यांना पिकांची नुकसानभरपाई देते, तिही तुटपुंजी त्यामुळे मोकाट हरणांमुळे शेतकरी हतबल झाला आहे.सांगली जिल्ह्यातील वाळवा, पलूस, कडेगाव या तीन तालुक्यांत हे अभयारण्य विस्तारले आहे. चौरंगीनाथ निसर्ग पर्यटन केंद्रापर्यंतचे वनविभागाचे क्षेत्र यात घेतल्यास सांगली, सातारा जिल्ह्यात अभयारण्याचा विस्तार होईल. यासाठी माजी वनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्यासह सत्ताधारी भाजपमधील नेत्यांनी प्रयत्न करावा व शेती, शेतकरी, प्राणी यांचे होणारे नुकसान टाळावे.अभयारण्य विस्तारिकरणाचे फायदेमोकाट हरणे बंदिस्त होतीलपिकांचे नुकसान टळेलकुत्र्यांच्या हल्ल्याचा धोका नाहीडोंगरमाथ्यावर वनसंपदा वाढेलसागरेश्वर ते चौरंगीनाथ परिसर घनदाट जंगलांनी हिरवागार होईलपर्यटकांची संख्या वाढेल.