शहरं
Join us  
Trending Stories
1
चिनी शस्त्रे 'फुसकी' निघाली, पाकिस्तनाने अमेरिकेच्या दारात 'झोळी' पसरली; US च्या 'या' घात अस्त्रांवर पाकचा डोळा!
2
टेस्टमध्ये फुटबॉलचं ट्विस्ट! हॅरी ब्रूकनं खांद्यानं उडवला स्टंपवरचा चेंडू; आधी पंतनं केली टाइमपास करतोय अशी तक्रार, मग...
3
"भारताने पाकिस्तानी एअरबेसवर 11 क्षेपणास्त्रे डागली, अल्लाहतालाने..."; इस्लामिक स्कॉलर्ससमोर पाकिस्तानचं रडगाणं!
4
ENG vs IND : भेदक मारा अन् 'स्लिप'मध्ये जागता पहारा! टीम इंडियानं उडवली यजमान इंग्लंडची झोप
5
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
6
शुबमन गिलनं उद्ध्वस्त केला ४६ वर्षांपूर्वीचा 'महा रेकॉर्ड'; गावसकर, सचिन, द्रविड अन् शास्त्रींना मागे टाकत बनला 'NO.1'
7
ENG vs IND : बुमराहच्या अनुपस्थितीत आकाश दीपचा "मैं हूँ ना...शो"! दोन्ही शतकवीरांच्या पदरी भोपळा
8
ENG vs IND : कमबॅकसाठी टीम इंडियानं उभारला धावांचा डोंगर; पहिल्या डावात फक्त एकाच गोष्टीची खंत!
9
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा
10
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
11
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
12
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
13
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
14
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
15
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
16
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
17
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
18
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
19
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
20
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग

फटाका कारखान्यात स्फोट

By admin | Updated: November 30, 2014 00:56 IST

तिघेजण गंभीर जखमी : विट्यात फटाके तयार करताना दुर्घटना

विटा : येथील तासगाव रस्त्यावर फटाक्यांच्या कारखान्यात शोभेची दारू तयार करीत असताना झालेल्या भीषण स्फोटात तिघेजण गंभीर जखमी झाले. रियाज गुलाब तांबोळी (वय २५), बिलाल मुस्ताकहुसेन मुल्ला (२४) व साजीद नजीर शिकलगार (२५, सर्व रा. विटा) अशी गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत. स्फोट इतका मोठा होता की कारखाना परिसरातील अर्धा किलोमीटरपर्यंतच्या लोकवस्तीला याचा हादरा जाणवला. कारखान्याशेजारील इमारतींच्या काचा फुटल्या असून, एका जीपसह दोन दुचाकीही जळाल्या आहेत. या घटनेत सुमारे पाच ते सहा लाखांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ही घटना आज, शनिवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली. विटा-तासगाव रस्त्यावर भरवस्तीत मुस्ताकहुसेन मुल्ला यांचा बाबालाल फायर वर्क्स नावाने शोभेची व फॅन्सी फटाक्यांचा कारखाना आहे. आज या कारखान्यात शोभेची दारू तयार करण्याचे काम सुरू होते. त्यावेळी दारूचा अचानक स्फोट झाला. स्फोटाच्या आवाजाने नागरिक भीतीने सैरावैरा धावू लागले. शेजारच्या इमारतीच्या काचा फुटल्या. स्फोटानंतर आगीने रौद्र रूप धारण केले. स्फोटात कामगार रियाज तांबोळी, कारखान्याचे मालक राजू ऊर्फ मुस्ताकहुसेन मुल्ला यांचा मुलगा बिलाल मुल्ला व शेजारच्या वेल्डिंग दुकानातील साजीद शिकलगार असे तिघेजण गंभीर जखमी झाले. त्यांना सांगलीच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या स्फोटानंतर लागलेल्या भीषण आगीत कारखान्याचे शेड व राजू नूरमहंमद मुल्ला यांची जीप, बबन मुल्ला व शाहरूख मुल्ला यांच्या दोन दुचाकी जळाल्या. विटा नगरपरिषदेच्या दोन अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. एक तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. पोलिसांनी स्फोट होताच शिवाजी चौकातच नाकाबंदी करून तासगाव रस्त्यावरील वाहतूक बंद केली होती. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अभिजित पाटील, पोलीस निरीक्षक अनिल पोवार यांच्यासह पोलीस कुमक घटनास्थळी दाखल झाली. तरुणांची कार्यतत्परता... विटा येथे फटाक्याच्या कारखान्यात स्फोट झाल्यानंतर सुमारे ४० ते ५० तरुणांनी जिवाची बाजी लावत गोडावूनमध्ये प्रवेश केला. त्यावेळी गोडावून व दुकानातील फॅन्सी फटाक्यांचा मोठा साठा तरुणांनी साखळी पध्दतीने उभा राहून तेथून बाहेर काढला. तसेच घरातील सिलिंडरही तरुणांनी अन्यत्र हलविले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. विट्यात सहा ठिकाणी फटाक्यांचा साठा... वाढत्या विटा शहरात फॅन्सी फटाक्यांचा जवळपास पाच ते सहा ठिकाणी साठा आहे. हा सर्व साठा भरवस्तीतच असल्याने नागरिकांचा जीव टांगणीला लागला आहे. भाळवणीपाठोपाठ विटा शहरातही फटाक्यांच्या कारखान्यात स्फोटाच्या घटना घडू लागल्याने विटेकर नागरिकांची सुरक्षा धोक्यात आली आहे. विटा शहरात फटाक्याचा कारखाना भरवस्तीतच असल्याने अनेक वर्षांपासून येथील नागरिकांना जीव मुठीत घेऊनच रहावे लागते.