शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

‘तासगाव’च्या कामगारांचे नेत्यांकडून शोषण

By admin | Updated: June 5, 2014 00:10 IST

पैशावरून संघटनेत फूट : विड्रॉल पावतीवर घेतल्या सह्या

सांगली : तासगाव (तुरची) येथील साखर कारखान्यातील कामगारांना गेल्या नऊ वर्षांत थकित पगार न मिळाल्यामुळे त्यांचा न्यायालयीन लढा सुरु होता. अखेर कामगारांनी लढाई जिंकल्यामुळे त्यांच्या थकित पगार, ग्रॅच्युईटी, भविष्यनिर्वाह निधी आदीच्या थकबाकीची १८ कोटी ३३ लाख ७२ हजारांची रक्कम बँकेत जमा झाली. परंतु, काही स्वयंघोषित कामगार नेत्यांनी अवसायक मंडळातील काही मंडळींना हाताशी धरून, मिळणार्‍या या रकमेतून ६ टक्के रक्कम देण्यासाठी कामगारांकडे तगादा लावला आहे. एवढेच नव्हे, तर बँकेच्या कोर्‍या विड्रॉल पावतीवर त्यांच्या सह्या करून पैसे ढापण्याचा प्रयत्न सुरु आहे. सर्व कामगारांकडून गोळा करण्यात येणारी रक्कम ८३ लाखांपर्यंत असल्याचे खात्रीशीर सूत्राने सांगितले आहे. तासगाव कारखान्याच्या कार्यक्षेत्रात तासगावच्या पश्चिमेचा भाग आणि पूर्ण पलूस तालुका येतो. उसाचे मुबलक क्षेत्र. कारखाना कृष्णा नदीपासून हाकेच्या अंतरावर. उत्तम प्रशासन असते आणि राजकीय हस्तक्षेप नसता, तर कारखाना आदर्शवत चालला असता़ पण, स्थापनेपासूनच राजकीय कुरघोड्या सुरू झाल्या. यामध्ये कामगार पुरता होरपळून गेला आहे. गेल्या दहा वर्षात कामगारांचा वेळेवर पगार झाला नाही. अनेक कामगारांना कामावरून कमी करण्यात आले, तरीही त्यांना थकित पगार, ग्रॅच्युईटी, भविष्यनिर्वाह निधीची रक्कम मिळाली नव्हती. तरीही २००३-०४ मध्ये कामगारांनीच गळीत हंगाम घेऊन तो यशस्वी ठरविला. यावेळी एक लाख १० हजार क्विंटल साखरेचे उत्पन्न घेतले होते. शेतकरी, वाहनधारकांचे पैसे देऊन स्वत: कामगार कमी पैशावर राबले. या कालावधीतील साखर विक्री करून १४ कोटी ५० लाख रूपये मुंबई उच्च न्यायालयाकडे ठेवण्यात आले होते. कामगारांचे थकित देणे भागविण्यासाठी न्यायालयातील रक्कम मिळावी, असा दावा उच्च न्यायालयात केला होता. त्यानुसार आॅक्टोबर २०१३ मध्ये न्यायालयाने बँकेतील रकमेतून प्राधान्यक्रमाने कामगारांची देणी भागविण्याची सूचना प्रशासनाला दिली होती. त्यानुसार ती रक्कम कामगारांसाठी मिळाली आहे. पण, ही रक्कम मिळविण्यासाठी आम्हीच प्रयत्न केल्याचा आव आणून स्वयंघोषित कामगार नेते कामगारांकडे पैशाची मागणी करू लागले आहेत. हंगामी कामगारांना दीड ते दोन लाख, तर नियमित कामगारांना दोन ते तीन लाखापर्यंत रक्कम मिळणार आहे. नियमित आणि हंगामी जवळपास सहाशे कामगार असून, यांच्याकडून स्वयंघोषित कामगार नेत्याने ६ टक्केनुसार पैशाची मागणी केली आहे. कामगारांकडून जवळपास ८४ लाख रूपये गोळा होणार आहेत. ही रक्कम गोळा करताना अवसायक मंडळातील काहींना हाताशी धरल्याची कामगारांमध्ये चर्चा सुरु आहे. कामगारांच्या टाळूवरचे लोणी खाणार्‍या स्वयंघोषित नेत्याला आता कामगारांनीच आवर घालण्याची गरज आहे. कामगारांकडून बँकेच्या कोर्‍या विड्रॉल पावतीवर सह्या घेऊन नंतर शंभर रूपयांच्या स्टॅम्पवर, ‘माझे कोणतेही देणे नाही, मी कुठेही तक्रार करणार नाही, पुन्हा पैसे मागणार नाही...’ आदीचे लेखी घेतले जात आहे. स्वयंघोषित कामगार नेत्याचा हा पराक्रम गृहमंत्री आर. आर. पाटील आणि खासदार संजय पाटील यांच्यापर्यंत पोहोचला आहे. त्यानंतर या दोन्ही नेत्यांनी त्या स्वयंघोषित नेत्याला अवसायक मंडळाने जवळ करू नये, असा सज्जड दमही दिल्याची चर्चा आहे. या स्वयंघोषित कामगार नेत्याला मंत्र्यांनी फटकारल्यामुळे त्याची चांगलीच पंचाईत झाली आहे. तरीही तासगाव तालुका सहकारी साखर कामगार संघ (इंटक) यांच्यामध्ये फूट पाडून आपली पोळी भाजून घेण्याचा या नेत्याचा प्रयत्न आहे. या नेत्याच्या कामगार संघटनेतील उचापतींना पदाधिकारीही कंटाळले आहेत. (प्रतिनिधी)