शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

रस्ते खुदाईचा महसूल केला पगारावर खर्च

By admin | Updated: December 11, 2014 23:48 IST

महापालिका प्रशासनाचा कारभार : ठेकेदाराची बिले थकली

सांगली : महापालिका हद्दीत केबलच्या चरी खुदाईसाठी रिलायन्स कंपनीने सुमारे आठ कोटी रुपयांचा कर भरला होता. ही रक्कम चरी मुजविणाऱ्या ठेकेदारांना न देता कर्मचाऱ्यांच्या वेतनावर खर्च करण्यात आल्याचा प्रकार आज स्थायी समिती सभेत उघडकीस आला. पालिका प्रशासनानेही तशी कबुली दिल्याने सदस्यांनी संताप व्यक्त केला. ठेकेदारांची बिले वेळेवर मिळत नसल्याने त्यांनी कामे थांबविल्याचेही सदस्यांनी सभापती संजय मेंढे यांच्या निदर्शनास आणून दिले. आठ महिन्यांपूर्वी शहरात रिलायन्स कंपनीने केबल टाकण्यासाठी मोठ्या प्रमाणात चरी खोदल्या. त्यापोटी कंपनीने पालिकेकडे ८ कोटी रुपयांचा कर जमा केला होता. पावसाळ्याच्या तोंडावर या चरी मुजविण्यासाठी प्रशासनाने जाहीर निविदा प्रसिद्ध केली. या निविदेत कंपनीने दिलेल्या करातून बिले दिले जातील, अशी अट होती. पण कालांतराने पालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर ठेकेदारांच्या बिलापोटी ठेवलेली रक्कम वेतनावर खर्च करण्यात आली. यावर सुरेश आवटी यांनी स्थायी सभेत जाब विचारला. ठेकेदाराच्या बिलाची रक्कम परस्पर खर्च कशी केली. याला जबाबदार कोण? अशी प्रश्नांची सरबत्तीही त्यांनी प्रशासनावर केली. आवटी यांनी प्रशासनाचा भोंगळ कारभारही सभेत चव्हाट्यावर आणला. मिरजेतील मिशन रुग्णालयाजवळील रस्त्याची २४ लाखांची निविदा प्रसिद्ध झाली आहे. निविदाधारक ठेकेदाराकडून रस्त्याचे काम पूर्ण करण्याऐवजी पॅचवर्क करण्यात आले. त्यावर वायफळ पैसा खर्ची टाकला. त्यामुळे पालिकेला आर्थिक नुकसान झाल्याचा आरोपही केला. त्यावर सभापती पॅचवर्कचे बिल देऊ नये, असे आदेश दिले. (प्रतिनिधी)एलबीटीची थेट वसुली एलबीटीप्रश्नी व्यापाऱ्यांवर चुकीच्या पद्धतीने फौजदारी कारवाई सुरू आहे. नोंदणीकृत नऊ हजारापैकी केवळ २२०० व्यापारी कर भरत आहे. उर्वरित व्यापाऱ्यांवर कारवाई का केली नाही? थेट व्यापाऱ्यांच्या दारात जाऊन वसुली करावी, अशी मागणी विष्णू माने यांनी केली. नगरसेविका अनारकली कुरणे यांनी पालिकेकडे ४०० कर्मचारी मानधनावर आहेत. प्रभागात दोन कर्मचारी सतत गैरहजर असतात. तरीही सर्व कर्मचाऱ्यांचे मानधन कसे निघते, असा सवाल केला. मेंढे यांनी आरोग्याधिकारी, मुकादम, स्वच्छता निरीक्षकांची बैठक घेण्याची ग्वाही दिली.