कुपवाड : रेकाॅडवरील हद्दपार गुन्हेगार प्रमोद ऊर्फ लाल्या प्रकाश राबडे (वय २८, रा. चांदणी चौक, सांगली) याला हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सांगलीतील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक रफीक शेख, सहायक फौजदार मारुती साळुंखे, अजय बेंद्रे, सुनील चौधरी, गजानन गस्ते, ज्योती चव्हाण यांचे पथक मंगळवारी रात्री बुधगाव रस्त्यालगत गस्तीवर होते. त्यावेळी त्यांना यल्लमा मंदिराच्या पाठीमागील रस्त्यावर अंधारात एक तरुण संशयितरीत्या फिरताना आढळला. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता तो रेकाॅडवरील हद्दपार गुन्हेगार प्रमोद राबडे असल्याचे निष्पन्न झाले. त्याला पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी १३ जुलै रोजी सांगली, कोल्हापूर, सातारा या तीन जिल्ह्यांतून हद्दपार केले होते. हद्दपारी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्याला अटक करून कुपवाड पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.