शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

येडेमच्छिंद्रचा पदांचा वनवास संपला

By admin | Updated: March 15, 2017 23:52 IST

वाळव्याच्या सभापतीपदी संधी : सचिन हुलवान यांच्या निवडीने कार्यकर्त्यांचा जल्लोष

निवास पवार ल्ल शिरटेदोन खासदार, जि. प. सभापती, सदस्य यासह कराड-वाळवा तालुक्यातील विविध संस्थांवर महत्त्वाची पदे भूषविणारे येडेमच्छिंद्र हे वाळवा तालुक्यातील गाव. पंचायत समितीच्या सदस्यपदापासूनच ५५ वर्षांपासून वंचित होते. यावेळी सचिन हुलवान यांच्या रुपाने हे सदस्यत्व पदरात पडले आणि आज हुलवान यांच्या गळ्यात सभापतीपदाची माळ पडल्याने क्रांतिसिंहांची जन्मभूमी असणाऱ्या या गावाचा पंचायत समितीमधील वनवास अखेर संपल्याची भावना ग्रामस्थांमधून व्यक्त होत होती.हुलवान यांची सभापतीपदी बिनविरोध निवड जाहीर होताच त्यांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करुन आनंदोत्सव साजरा केला. रेठरेहरणाक्ष जिल्हा परिषद गट ओ. बी. सी. साठी आरक्षित झाल्यानंतर हुलवान हे जिल्हा परिषदेसाठी प्रबळ इच्छुक होते. मात्र राजकीय घडामोडीत राष्ट्रवादीच्या तडजोडीत हुलवान यांना एक पाऊल मागे घेऊन पंचायत समितीसाठी अर्ज दाखल करण्यास पक्षश्रेष्ठींनी सांगितले होते. यासाठी हुलवान यांची तयारी नव्हती. तरीही पक्षप्रेमापोटी त्यांनी पं. स. साठी अर्ज दाखल केला.हुलवान यांना निवडणुकीत मिळवलेल्या यशाची पोहोच पावतीच माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांनी दिल्याचे राजारामबापू बँकेचे संचालक अ‍ॅड. संग्राम पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.निवडीनंतर जि. प. सदस्य धनाजी बिरमुळे यांच्याहस्ते नूतन सभापती हुलवान यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उमेश पवार, दिलीपराव देसाई, संग्राम पाटील, सरपंच संजय पाटील, सुनील पोळ, विशाल पवार, हौसेराव पाटील, शिवाजीराव पाटील, धनंजय पाटील, कुलदीप पाटील, सुहास पाटील, प्रा. आनंद पाटील, अभियंता सतीश देसाई, जाालिंदर पाटील, यशवंत पाटील, दत्तात्रय सावंत, प्रवीण हुलवान, निवास खंडागळे, पुरुषोत्तम पाटील, ग्रामसेवक जयवंत थोरात आदी उपस्थित होते.