शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

लाचखोर कार्यकारी अभियंता सूर्यकांत नलवडे निलंबित; राज्य शासनाची कारवाई

By अशोक डोंबाळे | Updated: August 25, 2022 20:29 IST

सांगली मुख्यालय सोडल्यास शिस्तभंगाची कारवाई

सांगली : ताकारी व म्हैसाळ उपसा जलसिंचन विभागाचा कार्यकारी अभियंता सूर्यकांत नलवडे आणि खासगी बांधकाम व्यावसायिक राहुल कणेगावकर यांना एक लाखांची लाच घेताना रंगेहात पकडल्यानंतर नलवडेला गुरुवारी निलंबित करण्यात आले. निलंबन कालावधीत सांगलीचे मुख्यालय वरिष्ठांच्या परवानगीशिवाय सोडल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा शासनाने दिला आहे.

सांगलीतील वारणालीमधील शासकीय कार्यालय परिसरातील सार्वजनिक स्वच्छता, उपाहारगृह, दुरुस्तीसाठी स्वच्छता कर्मचारी पुरविण्याची निविदा काढण्यात आली होती. ही निविदा देण्यासाठी एक लाखाची लाच घेताना नलवडे आणि त्याचा भाचा कणेगावकर यांना रंगेहात पकडण्यात आले. येथील सह्याद्री कन्स्ट्रक्शनच्या कार्यालयात ही कारवाई केली होती. या दोघांविरोधात संजयनगर पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. नलवडेला दि. ६ ऑगस्टरोजी अटक केली आहे. त्यानंतर विशेष न्यायाधीशांनी दि. २४ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली होती. नलवडेस ४८ तासांपेक्षा जास्त काळ पोलीस कोठडी मिळाली आहे. त्यामुळे महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ च्या नियम ४ (२) (अ) मधील तरतुदीनुसार पोलीस कोठडीत स्थानबद्ध केल्यापासून शासन सेवेतून निलंबित केले आहे, असे आदेश जलसंपदा विभागाचे उपसचिव अनिल देवकाते यांनी दिले आहेत.नलवडेस सांगली मुख्यालयात हजर राहण्याची सूचना दिली आहे. सांगली पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता मिलिंद नाईक यांच्या पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये, अन्यथा शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असेही शासन आदेशात म्हटले आहे.

खासगी व्यवसाय केल्यास शिस्तभंगाची कारवाई, भत्ताही बंद

कार्यकारी अभियंता सूर्यकांत नलवडेस निलंबन कालावधीत खासगी नोकरी अथवा व्यवसाय करता येणार नाही. जर त्याने निलंबन कालावधीत नोकरी किंवा व्यवसाय केला तर ती गैरवर्तणूक समजण्यात येईल. त्या कारणासाठी वेगळ्या शिस्तभंगाच्या कारवाईस तो पात्र ठरेल, तसेच निर्वाह भत्ता मिळण्याचा हक्कही गमवावा लागेल.