पडळकर म्हणाले की, राज्य सरकारच्या सांगण्यावरून सुमारे ७५ लाख वीजग्राहकांना कनेक्शन तोडण्याची नोटीस महावितरणने पाठविली आहे. सामान्य वीज ग्राहक आणि शेतकऱ्यांना त्रास देण्याचे षडयंत्र महाविकास आघाडी सरकारने रचलेले आहे. सरकारचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी शंभर युनिट वीजबिल माफ करण्याचे आश्वासन दिले होते. ते तर माफ केले नाही उलट सरकारकडून वीजबिल न भरल्यास वीज कनेक्शन कट करण्याची भाषा सुरू आहे. करूनही राज्य सरकारने सक्तीची वीजबिल वसुली सुरू ठेवल्यास यापुढे भाजप आणखी तीव्र आंदोलन करेल. त्यानंतर होणाऱ्या परिणामास पूर्णपणे शासनच जबाबदार राहील, असा इशाराही पडळकर यांनी दिला.
आटपाडी येथील महावितरण केंद्राजवळ मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. यावेळी बंडोपंत देशमुख, अरुण बालटे, जयवंतराव सरगर, उमाजी सरगर, प्रभाकर पुजारी, साहेबराव काळेबाग, अनिल सूर्यवंशी, उपसरपंच डॉ . अंकुश कोळेकर उपस्थित होते.
फोटो-०५आटपाडी१