शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारांची परीक्षा!

By admin | Updated: February 21, 2017 00:31 IST

जि. प., पं. स. निवडणूक : ८२४ उमेदवारांचे भविष्य होणार मशीनबंद

सातारा : जिल्हा परिषदेसाठी उभ्या असणाऱ्या २८९ व पंचायत समित्यांसाठी उभ्या असणाऱ्या ५३५ अशा ८२४ उमेदवारांचे भविष्य आज, मंगळवारी मशीनबंद होणार आहे. जिल्ह्यातील २ हजार ५८४ मतदान केंद्रांवर आज सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होणार असून, सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचा जाहीर प्रचार रविवारी थांबला. जिल्ह्यातील ६४ गटांत तसेच १२८ गणांमध्ये राजकीय मंडळींसह प्रशासनाने हाय अलर्ट ठेवला आहे. आज, मंगळवारी जिल्ह्यातील १९ लाख ६६ हजार ५८४ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.सोमवारी दिवसभर उमेदवारांनी मतदारांच्या गाठीभेटीवर भर दिला. सोमवारची रात्र तर वैऱ्याची आहे, असे समजूनच उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते रात्री उशिरापर्यंत जागे राहिले. विरोधकांकडून मतदारांची फोडाफोड होण्याची शक्यता लक्षात घेऊन बहुतांश उमेदवार सावधानता बाळगत होते. सोमवारी प्रत्येक तालुक्यातील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मतदान कर्मचाऱ्यांना साहित्याचे वाटप केले. संबंधित कर्मचारी मतदानकेंद्राच्या ठिकाणावर पोहोचल्याचा ‘रिपोर्ट’ आल्यावर मगच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.