शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

कसबे डिग्रज येथील आरोग्य शिबिरात १५० रुग्णांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:38 IST

कसबे डिग्रज : कोरोनाने माणसांना दूर केले आहे. अशा काळात आरोग्य महत्त्वाचे आहे. लाेकांची गरज ओळखून कसबे डिग्रज (ता. ...

कसबे डिग्रज : कोरोनाने माणसांना दूर केले आहे. अशा काळात आरोग्य महत्त्वाचे आहे. लाेकांची गरज ओळखून कसबे डिग्रज (ता. मिरज) येथे आरोग्य शिबिर घेऊन समाजात चांगले काम केले आहे, हा स्तुत्य उपक्रम आहे, असे प्रतिपादन मानवाधिकार संघटनेचे अध्यक्ष आनंदराव नाईक यांनी केले.

कसबे डिग्रज (ता. मिरज) येथे अण्णासाहेब डांगे वैद्यकीय महाविद्यालय आणि मानवाधिकार संघटना यांनी आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरास मोठा प्रतिसाद मिळाला. रक्त, दमा, पोटविकार, हाडांचे विकार, साखर तपासणी आदी सुमारे १५० रुग्णांची तपासणी करण्यात आली. यावेळी २० जणांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याचप्रमाणे २ जणांना कोरोना तपासणीसाठी पाठविण्यात आले. यावेळी गावातील ‘कोरोना योद्धे’ म्हणून डॉक्टर्स, आशा सेविकांचा सत्कार करण्यात आला. हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना मास्कचे वाटप करण्यात आले.

मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदीप सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक केले. अध्यक्ष आनंदराव नलवडे, नूतन उपसरपंच सागर चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी डॉ. ए. एस. जाधव, डॉ. एम. एच. पाटील यांच्यासह मान्यवर, मानवाधिकार संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. प्रशांत भोसले यांनी आभार मानले.