आष्टा : सेवानिवृत्त एसटी कर्मचारी संघटना व अण्णासाहेब डांगे वैद्यकीय महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आरोग्य शिबिराचे उद्घाटन अप्पर तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी केले. यावेळी १२४ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. दहा रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
यावेळी आदर्श शिक्षक पुरस्कार विजेत्या फरिदा मकानदार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सुभाष तगारे, विक्रम भोपे, समीर लतीफ, बाबूराव नायकवडी, बाबासाहेब औताडे, जयसिंग चव्हाण, समीर नायकवडी, रिहाना ईनामदार, बाजीराव हाबळे, अभिजित थोरात, सेवानिवृत्त एसटी कर्मचारी संघटनेचे विजय कदम, आब्बास लतीफ, डी. एस. कोळी, कै. बापूसाहेब शिंदे संस्थेचे संग्राम शिंदे, अशोक मदने उपस्थित होते.
फोटो -०९०२२०२१-आयएसएलएम- आष्टा सत्कार न्यूज
: आष्टा आरोग्य शिबिरावेळी आदर्श शिक्षिका फरिदा मकानदार यांचा सत्कार करताना अतिरिक्त तहसीलदार दीक्षांत देशपांडे. शेजारी संग्राम शिंदे, आब्बास लतीफ, अनिल कोळी उपस्थित होते.