याबाबत पोलिसांत दाखल झालेल्या तक्रारीनुसार, रिपाइं युवा आघाडीचा जिल्हाध्यक्ष व माजी नगरसेवक अशोक कांबळे हा गेल्या चार महिन्यांपासून आपल्या पहिल्या पत्नीला सोडून दुसऱ्या पत्नीच्या घरी रहात आहे. रविवारी कांबळे याच्या पहिल्या पत्नी बाजारात गेल्या असताना अशोक कांबळे हा दुसऱ्या पत्नीसोबत तेथे दिसून आला. यावेळी अशोक कांबळे यास ‘मी तुमची पहिली पत्नी आहे, घरी चला’, असे म्हटल्याने भांडण झाले. यावेळी अशोक कांबळे याने पहिल्या पत्नीस अश्लील शिवीगाळ करुन तिचे कपडे फाडून मारहाण व विनयभंग केला. यावेळी अशोकच्या दुसऱ्या पत्नीनेही मारहाण केल्याची तक्रार आहे. याबाबत पीडित महिलेले शहर पोलिसात फिर्याद दिली असून, पोलिसांनी अशोक कांबळे याच्यासह त्याच्या दुसऱ्या पत्नीवर मारहाण व विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
पत्नीचे कपडे फाडून मारहाण, मिरजेत माजी नगरसेवकावर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:36 IST