सांगली : सांगली लोकसभा मतदार संघात दि. 23 एप्रिल रोजी मतदान झाले. त्यानंतर विधानसभा मतदार संघ निहाय सर्व ईव्हीएम मशिन्स सेन्ट्रल वेअर हाऊस येथे आणण्यात आल्या. या ईव्हीएम मशिन्स ठेवलेली स्ट्राँग रूम सील बंद करण्यात आली.
निवडणूक निरीक्षक आशिष सक्सेना, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, मिरज उपविभागीय अधिकारी संदीपसिंह गिल, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनाज मुल्ला, सर्व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत ईव्हीएम मशिन्स ठेवलेली स्ट्राँग रूम सील बंद करण्यात आली.
या सर्व ईव्हीएम मशिन्स गोदामात लावून घेण्यात आल्या. सेंट्रल वेअर हाऊस येथील एका गोदामात 6 कम्पार्टमेंटमध्ये विधानसभा मतदारसंघनिहाय ही ईव्हीएम मशिन्स लावून घेण्यात आली. त्यानंतर विधानसभा मतदारसंघ निहाय ईव्हीएम मशिन्स सीलबंद करण्यात आली. त्यानंतर सवांर्ंच्या उपस्थितीत स्ट्राँग रूम सीलबंद करण्यात आली व केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ताब्यात स्ट्राँग रूमची किल्ली देण्यात आली.
या स्ट्राँग रुमवर मतमोजणीपर्यंत दररोज राजपत्रित अधिकारी व पोलीस अधिकारी, 16 सीसीटीव्ही कॅमेरे आणि 100 पोलीस यांची 24 तास कडक पहारा राहणार आहे.