शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

महापौर बेदखल, उपमहापौर नाॅट रिचेबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:28 IST

सांगली : महापालिकेच्या महापौर, उपमहापौर निवडीवरून भाजपमधील नाराजीनाट्य संपता संपेना. रविवारी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या नगरसेवकांच्या बैठकीतही ...

सांगली : महापालिकेच्या महापौर, उपमहापौर निवडीवरून भाजपमधील नाराजीनाट्य संपता संपेना. रविवारी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या नगरसेवकांच्या बैठकीतही काही सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. महापौर गीता सुतार यांची मुदतवाढीची मागणी नेत्यांनी बेदखल केली तर उपमहापौर आनंदा देवमाने हे बैठकीला गैरहजर राहिले. बैठकीनंतर आयोजित स्नेहभोजनालाही काही नगरसेवकांनी दांडी मारल्याचे समजते. त्यामुळे महापौर पदासाठी इच्छुक असलेल्यांची धाकधूक वाढली आहे.

महापालिकेत भाजपला कसलीच अडचण नाही, महापौर हा भाजपचाच होणार, असे प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी जाहीर केले असले तरी पक्षातंर्गत नाराजी अद्याप संपलेली नाही. महापौर, उपमहापौर निवडीसाठी येत्या १८ रोजी उमेदवारी अर्ज दाखल करायचे आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये नाराजी नाट्य सुरू झाले आहे. यापूर्वी अनेकदा पक्षाच्या बैठकीत उपमहापौर देवमाने यांनी उघडपणे कारभाराबद्दल नाराजी व्यक्त केली होती. आता तर ते प्रदेशाध्यक्षांच्या बैठकीला गैरहजर राहिले. शिवाय गेल्या दोन दिवसापासून त्यांचा दूरध्वनीही बंद येत आहे.

दुसरीकडे महापौर गीता सुतार यांनी सहा महिने मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे. भाजपच्या नेत्यांनी आपल्याला शब्द दिल्याचे त्यांचे म्हणणे आहे. बैठकीत त्यांनी प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्याकडे मुदतवाढीची मागणी करताना दिलेल्या आश्वासनाची आठवण करून दिली. पण पाटील यांनी असा कोणताच शब्द आपण दिला नसल्याचे सांगत त्यांना बेदखल केले. सुतार यांनी काही नगरसेवकांची साक्ष काढण्याचाही प्रयत्न केला. पण या नगरसेवकांनी त्यावर मौन पाळले. एकूणच भाजपमध्ये सारे काही आलबेल नाही. नगरसेवकांची नाराजी दूर करण्याचे आव्हान नेत्यासमोर आहे.

चौकट

मला पद नको

बैठकीत मिरजेतील एका नगरसेवकाने तर उघडपणेच नाराजी व्यक्त केली. आधी या नगरसेवकाने नेत्यांना नमस्कार केला. त्यानंतर तुम्ही मला पद देण्याचे आश्वासन दिले होते. पण अडीच वर्षात काही पद दिले नाही. आता मला कुठलेही पद नको, असे म्हणत ते बैठकीतून निघून गेले.