शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

सत्ता नसली तरी प्रश्न सोडवावेच लागणार

By admin | Updated: October 15, 2015 00:26 IST

जयंत पाटील : पक्षसंघटनेत नव्या चेहऱ्यांना संधी

इस्लामपूर : सत्ता असो वा नसो, गावा-गावातील लोकांचे प्रश्न सोडविण्याचे काम आपणास करावे लागणार आहे. पक्षसंघटनेत नव्या चेहऱ्यांना संधी देऊन संघटना अधिक गतिमान करू, असा विश्वास माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केला़ वाळवा तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेसने येथे आयोजित केलेल्या एकदिवसीय ‘जयंत युवा आत्मभान’ शिबिराच्या समारोप समारंभात ते बोलत होते. कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख, सिनेअभिनेते समृध्दी जाधव, कामधेनू सेवा परिवाराचे डॉ़ लक्ष्मण आसबे, माजी आमदार मानसिंगराव नाईक यांची उपस्थिती होती. युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संजय पाटील, उद्योजक सर्जेराव यादव यांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला.आ़ पाटील म्हणाले की, आपणास विरोधी पक्षाची जबाबदारी पार पाडावी लागणार आहे़ राज्यात मंत्र्यांचा गोंधळ सुरू आहे़ आम्ही पूर्वी दुष्काळी परिस्थितीत जेवढी मदत केली होती, तेवढीही मदत भाजपचे सरकार करीत नाही़ इंदू मिलची जागा डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास मिळण्यासाठी आम्ही राज्य सरकारकडून पैसे भरले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी आम्ही अरबी समुद्रात जागा निश्चित करून डिझाईन केले; मात्र याची कुठे चर्चा होत नाही़ इंद्रजित देशमुख यांनी ‘राष्ट्रनिर्मितीमध्ये युवकांची भूमिका’ या विषयावर मार्गदर्शन केले़ ते म्हणाले की, बुध्दीबरोबर कष्ट करण्याची वृत्ती हवी़ एकाच क्षेत्रात आपण दहा वर्षे काम केले, तर तुम्ही त्या क्षेत्रात यशस्वी होऊ शकता. ़ समृध्दी जाधव ‘युवकांची दशा व दिशा’या विषयावर म्हणाले की, कोणाची पोटी जन्म घ्यावा, हे आपल्या हाती नाही़ मात्र निश्चित ध्येय व मनगटातील बळाच्या जोरावर तुम्ही यश गाठू शकता़ आत्मभान बाळगणाारा युवक निश्चित ध्येयापर्यंत पोहोचू शकतो़ डॉ़ लक्ष्मण आसबे यांनी ‘तेजस्वी युवक आणि संवाद कौशल्य’ या विषयावर तसेच युवक राष्ट्रवादीचे मिरज तालुकाध्यक्ष प्रमोद इनामदार, महिला राष्ट्रवादीच्या वाळवा तालुकाध्यक्षा सौ़ सुस्मिता जाधव यांनीही मनोगत व्यक्त केले़ याप्रसंगी माणिकराव पाटील, पी़ आऱ पाटील, प्रा़ शामराव पाटील, विष्णुपंत शिंदे, बी़ के. पाटील, नेताजीराव पाटील, बाळासाहेब पाटील, विजयबापू पाटील, विराज शिंदे, दादासाहेब मोरे, सुनील पोळ उपस्थित होते. राष्ट्रवादीचे पदाधिकारी उमेश पवार यांनी आभार मानले. गोपाळ पाटसुपे यांनी सूत्रसंचालन केले़ (वार्ताहर)