फोटो -
सांगली नागरी बँक असोसिएशनच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सुधीर जाधव यांनी मार्गदर्शन केले.
दुधोंडी : कोरोनाच्या काळात संपूर्ण उद्योग, व्यापार, शेती व्यवसायावर परिणाम झाला. त्यामुळे बँकांनाही मार्च महिन्यात वसुलीला निर्बंध घातले गेले. अशा परिस्थितीत नागरी बँकांनी ग्राहकांना कोणत्याही प्रकारे वेठीस धरले नाही, तर बँका ग्राहकांच्या सोयीसाठी अविरत चालू ठेवून ग्राहकहित पाहिले, असे प्रतिपादन नागरी बँक असोसिएशनचे अध्यक्ष सुधीर जाधव यांनी केले. सांगली जिल्हा नागरी बँक असोसिएशनच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते.
सुधीर जाधव म्हणाले की, कोरोना काळात बँकेच्या कर्मचाऱ्यांना बँकेत येण्यासाठी अनंत अडचणी येत होत्या. याबाबत असोसिएशनच्या माध्यमातून जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख यांना निवेदन देऊन बँकेच्या अडचणी सांगितल्या. शासकीय परवानगी घेऊन बँका ग्राहकांच्या सोयीसाठी अविरत चालू ठेवण्यात यश मिळाले. तसेच जिल्ह्यातील १९ बँकांपैकी १७ बँका या नफ्यात आहेत. तसेच सहा बँकांचा एनपीए शून्य आहे. इतर बँकांचा एनपीए पाच ते सहा राखण्यात बँकांना यश मिळाले.
यावेळी जे. के. बापू जाधव, गणेशराव गाडगीळ, बाळासाहेब पवार, श्यामराव पाटील, वैभवराव पुदाले, महेश्वर हिंगमिरे, सुषमा माणगावकर, शिवलिंग सनबे, जयदीप थोटे, संदीप पाटील, अर्जुन वडगावे, पांडुरंग कटरे आदी उपस्थित होते.
सीईओ चंद्रकांत करंदीकर यांनी सूत्रसंचालन केली. राजारामबापू बँकेचे अध्यक्ष श्यामराव पाटील यांनी आभार मानले.