शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

इथेनॉल निर्मितीमधून शेतकऱ्यांचे हित जपणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:19 IST

इस्लामपूर : साखर कारखानदारी अडचणीच्या काळातून जात आहे. अशावेळी फायदेशीर ठरणाऱ्या उपपदार्थांची निर्मिती महत्त्वाची ठरते. इथेनॉल निर्मिती ...

इस्लामपूर : साखर कारखानदारी अडचणीच्या काळातून जात आहे. अशावेळी फायदेशीर ठरणाऱ्या उपपदार्थांची निर्मिती महत्त्वाची ठरते. इथेनॉल निर्मिती प्रकल्प शेतकऱ्यांच्या हिताचा आहे. यातून साखर कारखान्यांना दिलासा मिळू शकतो. साखराळे युनिटमध्ये दिवसाला ७८ हजार लिटर इथेनॉल निर्मिती केली जाणार असून वाटेगाव-सुरुल युनिटमध्ये दिवसाला १ लाख ५० हजार लिटर क्षमतेचा प्रकल्प उभारला जाईल, अशी घोषणा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केली.

राजारामबापू साखर कारखान्याच्या डिस्टिलरी विभागात उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मिती प्रकल्पाचा पाटील यांच्याहस्ते प्रारंभ करण्यात आला. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील, उपाध्यक्ष विजयराव पाटील, दूध संघाचे अध्यक्ष विनायकराव पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील उपस्थित होते.

पाटील म्हणाले, अतिरित साखर उत्पादन हा साखर उद्योगासमोरील मोठा प्रश्न आहे. साखर विकल्यावर पैसे मिळणार. तोपर्यंत प्रत्येक पोत्यास २५० ते २७५ रुपयांच्या व्याजाचा भुर्दंड बसतो. एफआरपी १४ दिवसांच्या आत देणे कायद्याने बंधनकारक आहे. इथेनॉल ऑईल कंपनीस विकल्यावर १५ दिवसात पैसे मिळू शकतात.

पी. आर. पाटील म्हणाले, एक क्विंटल साखर तयार करायला ३३५० रुपये खर्च येत असून साखरेचा दर ३१०० रुपये आहे. क्विंटलला २५० चा घाटा आहे. साखरेचे उत्पादन वाढले, मात्र खप नाही. आपणास डिसेंबर महिन्यात १ लाख ७५ हजार क्विंटल साखर विक्रीचा कोटा मिळाला. मात्र त्यातील केवळ ६५ हजार क्विंटल साखरच विकली गेली आहे. साखरेला ३५०० रुपये दर मिळावा, ही आपली मागणी आहे. केंद्र सरकारने ३३०० चा दर जुलै महिन्यात जाहीर केला. अद्याप त्याची कार्यवाही नाही. एकरकमी एफआरपी देणे अडचणीचे झाले आहे. केंद्राकडून ९२ कोटी रुपयांचे येणे आहे.

कार्यकारी संचालक आर. डी. माहुली, सभापती शुभांगी पाटील, उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील, आष्ट्याच्या नगराध्यक्षा स्नेहा माळी, उपनगराध्यक्षा तेजश्री बोंडे, देवराज पाटील, बाळासाहेब पाटील, अरुण कांबळे, छायाताई पाटील, सुस्मिता जाधव, शहाजी पाटील उपस्थित होते.

विश्वनाथ पाटसुते यांनी सूत्रसंचालन केले.

फोटो ओळी- ३११२२०२०-आयएसएलएम-राजारामबापू न्यूज : राजारामबापू कारखान्याच्या इथेनॉल निर्मिती प्रकल्पाच्या प्रारंभ कार्यक्रमात जयंत पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पी. आर. पाटील, विजयराव पाटील, प्रा. शामराव पाटील, अविनाश पाटील, सभापती शुभांगी पाटील उपस्थित होत्या.