शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

खटावमध्ये विलगीकरण कक्षातून रुग्णाचे पलायन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:29 IST

टाकळी : खटाव (ता. मिरज) येथील जिल्हा परिषदेच्या विलगीकरण कक्षातून एक रुग्णाने पलायन केल्याने खळबळ उडाली आहे. खटाव ...

टाकळी : खटाव (ता. मिरज) येथील जिल्हा परिषदेच्या विलगीकरण कक्षातून एक रुग्णाने पलायन केल्याने खळबळ उडाली आहे. खटाव आपत्ती व्यवस्थापन समितीकडून या रुग्णाची शोधाशोध करण्यासाठी धावपळ सुरू होती.

खटावमध्ये ३७ कोरोना रुग्ण उपचाराखाली आहेत. त्यापैकी चार जणांना खटाव येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये सुरू केलेल्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. केवळ एक दिवसापूर्वी ठेवण्यात आलेल्या या रुग्णाने विलगीकरण कक्षातून पलायन केले. पलायन केलेल्या रुग्णास शोधण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन समितीची धावपळ सुरू होती. खटावमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने आपत्ती व्यवस्थापन समितीकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. रुग्ण संख्या कमी व्हावी, यासाठी विलगीकरण कक्षाची सुरुवात केली आहे. मात्र, विलगीकरण कक्षातूनच रुग्णांचे पलायन होत असल्याने खटावमध्ये रुग्णसंख्या वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. विलगीकरण कक्षाबाहेर एका कर्मचाऱ्याची नियुक्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे. पलायन केलेल्या रुग्णावर आपत्ती व्यवस्थापन समिती काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.