आष्टा : कोरोनामुळे भारतातील नव्हे तर जगातील व्यवहार ठप्प झाले. मात्र याही परिस्थितीत अण्णासाहेब डांगे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना ऑनलाईन धडे दिले. कोरोनामुळे आलेली निराशा बाजूला झटकून नवनिर्मितीसाठी नूतन अभियंत्यांनी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव ॲड. चिमण डांगे यांनी केले.
अण्णासाहेब डांगे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रथम वर्ष अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रथम वर्ष पालक मेळावा उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कार्यकारी संचालक प्रा. आर. ए. कनाई, अकॅडेमिक डीन डॉ. सुयोग कुमार तारळकर, प्राचार्य डॉ. नवनीत सांगले यांच्यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.
प्रा. आर. ए. कनाई म्हणाले, ‘अण्णासाहेब डांगे अभियांत्रिकी महाविद्यालयाने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी विविध अभ्यासक्रम सुरू केले आहेत. विद्यार्थ्यांनी जिद्दीने यशाची शिखरे पादाक्रांत करावीत.’
डॉ. सुयोगकुमार तारळकर यांनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील विविध शाखांची माहिती दिली. डॉ. संतोष मोहिते यांनी स्वागत केले. प्रा. शैलेंद्र हिवरेकर यांनी आभार मानले.
फोटो-०५शिराळकर१
फोटो : आष्टा येथील अण्णासाहेब डांगे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रथम वर्ष पालक-विद्यार्थी मेळाव्यात ॲड. चिमण डांगे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्रा. आर. ए. कनाई, डॉ. सुयोगकुमार तारळकर, प्रा. शैलेंद्र हिवरेकर उपस्थित होते.