शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

अभियांत्रिकी तरुणाची सांगलीवाडीत आत्महत्या

By admin | Updated: January 29, 2017 23:23 IST

तिसऱ्या मजल्यावरून उडी; कारण अस्पष्ट

सांगली : अभियांत्रिकीची पदवी घेतलेल्या सांगलीवाडीतील जगदीश सुभाष जाधव (वय २४) या तरुणाने स्वत:च्या घराच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली. रविवारी सकाळी साडेआठ वाजता ही घटना घडली. घटनेची शहर पोलिस ठाण्यात नोंद आहे.जगदीश जाधव हा सांगलीवाडीतील डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाजवळ आई, वडील, मोठा भाऊ व भावजय यांच्यासमवेत राहत होता. त्याने वर्षापूर्वी अभियांत्रिकीची पदवी घेतली आहे. त्याचे कुटुंब मूळचे कोल्हापूरचे आहे. २५ वर्षांपूर्वी ते सांगलीवाडीत स्थायिक झाले आहेत. त्यांचे तीनमजली घर आहे. पहिल्या मजल्यावर वडिलांचा वायनरीचा उद्योग सुरू होता. काही वर्षांपूर्वी हा कारखाना बंद करुन त्यांनी अभियांत्रिकी महाविद्यालयास लागणारे साहित्य तयार करण्याचा कारखाना सुरु केला आहे. या कारखान्याची जबाबदारी जगदीश व त्याचा भाऊ सांभाळत होते. रविवारी सकाळी घरातील लोक कामात होते. त्यावेळी जगदीश तिसऱ्या मजल्यावरील छतावर गेला व तेथून त्याने उडी घेतली. गंभीर जखमी अवस्थेत त्याला तातडीने उपचारार्थ सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. पण वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तो मृत झाल्याचे घोषित केले. त्याचे दोन्ही पाय मोडले होते. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, आत्महत्येच्या कारणाबाबत सांगलीवाडी परिसरात उलटसुलट चर्चा सुरू आहे. अधिक तपास शहर पोलिस करीत आहेत. (प्रतिनिधी)