लिंगनूर : शिक्षकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी शिक्षक समिती आग्रही आहे. १ ली ते ७ वीच्या प्रत्येक शाळेस मुख्याद्यापक, विषय शिक्षकांना ४३०० ची वेतनश्रेणी, अंशदान योजनेत शासनाचे दान (वाटा) भरावयासाठी पाठपुरावा करणे यासह राज्यातील तमाम शिक्षकांच्या महत्त्वाच्या प्रश्नांसाठी शिक्षणमंत्री, ग्रामविकासमंत्री व राज्य शासनाकडे नेटाचे प्रयत्न सुरू आहेत, असे प्रतिपादन शिक्षक समितीचे राज्य अध्यक्ष काळुजी बोरसे-पाटील यांनी केले. ते आज मिरज येथील शेतकरी भवनातील सभागृहात आयोजित शिक्षक समितीच्या त्रैवार्षिक अधिवेशनात बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी राज्यनेते विश्वनाथ मिरजकर, राज्य कोषाध्यक्ष किरण गायकवाड आदी मान्यवरांची उपस्थिती होती.बोरसे-पाटील म्हणाले, राज्यातील आंतरजिल्हा बदलीत सुलभता यावी म्हणून राज्याचे रोष्टर बनवून त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. १ ली ते ५ वी साठीही पदवीधर अध्यापक मिळाला पाहिजे, अंशदान योजनेत केवळ १ नोव्हेंबरनंतरच्या शिक्षकांच्या पगारातून कपाती सुरू आहेत; मात्र शासनाने आपला वाटा खात्यावर वर्ग केलाच नाही. त्यासाठी राज्य शासनाच्या अर्थ विभागाकडे तरतूद व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मिरज तालुक्याची कार्यकारिणी अशी : तालुका नेते - हरिभाऊ गावडे, अध्यक्ष-कुबेर कुंभार, सरचिटणीस-सुरेश नरुटे, कार्याध्यक्ष-विकास चौगुले, उपाध्यक्ष-सहदेव बागी, सुभाष ओमासे, तात्यासाहेब बंडगर आदींची निवड केली. (वार्ताहर)शिक्षक बँकेचे रणशिंगयाच त्रैवार्षिक अधिवेशनात आज शिक्षक बॅँकेच्या संचालक मंडळाने सर्व प्रकारच्या कर्जावरील दर अर्ध्या टक्क्याने कमी केला असल्याचे जाहीर केले; तर विरोधक करीत असलेल्या आरोपांवर विश्वास न ठेवता सभासदांनी योग्य पडताळा जरूर करावा, असे आवाहन करीत किरण गायकवाड यांनी निवडणुकीचे रणशिंग फुंकले.
शिक्षकांच्या समस्यांसाठी शासनाकडे आग्रही
By admin | Updated: November 23, 2014 23:56 IST