शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

कामेरीच्या पियुषला हवाय मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2016 00:32 IST

थॅलेसेमियाचा आजार : ‘ब्रेन मॅरो’ शस्त्रक्रियेसाठी वीस लाखांची गरज

कामेरी : कामेरी (ता. वाळवा) येथील पांडुरंग माळी या शेतमजुराचा आठ वर्षांचा मुलगा पियुष याला खेळण्या-बागडण्याच्या वयात थॅलसेमिया आजार जडला आहे. वेळीच उपचार झाले नाहीत, तर त्याला प्राण गमवावा लागणार आहे. या आजारावर ब्रेन मॅरो ट्रान्सप्लांटेशन ही शस्त्रक्रिया करावी लागणार असून, यासाठी अंदाजे २० लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. समाजातील दानशूर व्यक्ती, सामाजिक, सेवाभावी संस्थांनी मदतीचा हात पुढे करावा, अशी मागणी माळी कुटुंबियांनी केली आहे.येथील शेतकरी कुटुंबातील पांडुरंग माळी यांचा तिसरीत शिकणारा मुलगा पियुष शाळेत अत्यंत हुशार आहे. सतत हसत असणाऱ्या, घरातील सर्वांच्याच मनात लाघवी बोलण्याने वेगळेच स्थान निर्माण करणाऱ्या पियुषला थॅलसेमिया हा आजार जडला आहे. सध्या त्याच्या शरीराची आतून कणा-कणाने झिज सुरू आहे. त्याची तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली आहे. यासाठी त्याच्यावर बोन मॅरो ही शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. तरच त्याची या आजारातून मुक्तता होईल, असे डॉक्टरांनी सांगितले आहे. (वार्ताहर)दानशूर व्यक्तींनी पुढे येण्याची गरजया शस्त्रक्रियेसाठी रक्ताच्या नात्यातील व्यक्तीचा डीएनए मिळता-जुळता असेल, तरच ही अवघड शस्त्रक्रिया होते. या निकषानुसार पियुषचा अडीच वर्षाचा भाऊ आयुष याची या शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली आहे. भावाचा बोन मॅरो घेऊन पियुषचा जीव वाचविला जाणार आहे. या शस्त्रक्रियेसाठी २० लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असून, ही शस्त्रक्रिया बेंगलोर येथे होणार आहे. हा खर्च करणे माळी कुटुंबियांना अशक्य गोष्ट आहे. त्यामुळे समाजातील दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधींनी आर्थिक मदत करावी, अशी विनंती माळी कुटुंबियांनी केली आहे.