शहरं
Join us  
Trending Stories
1
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
2
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
3
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
4
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
5
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
6
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
7
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
8
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
9
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
10
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
11
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
12
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
13
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
14
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
15
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
16
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
17
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
18
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
19
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
20
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप

सेवानिवृत्तांना विश्रांती देऊन पदवीधर बेरोजगार तरुणांना काम द्या; डीएड, बीएड, तरुणांना शिक्षक म्हणून नियुक्तीची मागणी

By अशोक डोंबाळे | Updated: August 25, 2023 14:33 IST

शेकापच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेसमोर निदर्शने :

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : प्राथमिक शाळांमधील सेवानिवृत्तांच्या नियुक्त्या रद्द करुन डीएड, बीएड, शिक्षण घेतलेल्या बेरोजगार तरुणांना शिक्षक म्हणून नियुक्ती देण्याच्या मागणीसाठी शेतकरी कामगार पक्षाच्या नेतृत्वाखाली पदवीधर तरुणांनी शुक्रवारी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढून निदर्शने केली. शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे बेरोजगारांची आर्थिक पिळवणूक होत असल्याचा तरुणांनी आरोपही केला.

शेतकरी कामगार पक्षाचे ॲड. अजित सूर्यवंशी, तेजस्वीनी सूर्यवंशी, जिल्हाध्यक्ष दिगंबर कांबळे, सचिन करगणे, शिवाजी त्रिमुखे, वैभवराज शिरतोडे, किरण कांबळे, सचिन सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेवर मोर्चा काढून निदर्शने केली. तसेच जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्याकडे मागण्यांचे निवेदन दिले. भारतीय शेतकरी कामगार पक्ष संलग्न डीएड, बीएड, बेरोजगार कृती समितीने दिलेल्या निवेदनात म्हटले की, गेल्या दहा ते बारा वर्षांपासून शिक्षकांची नोकरभरती झाली नसल्यामुळे दहा हजाराहून अधिक डीएड, बीएड, तरुण नोकरीच्या शोधात फिरत आहेत. अशा हुशार अभ्यासू तरुण आणि कार्यक्षम असलेल्या बेरोजगार शिक्षकांना जिल्हा परिषदेच्या सेवेत तातडीने सामावून घेण्याची गरज आहे. याकडे शासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष करुन सेवानिवृत्त ६० ते ६५ वयोगटातील शिक्षकांना पुन्हा कामाला जुंपले आहे. वृद्धत्वाकडे झुकलेल्या शिवाय दरमहा तीस ते चाळीस हजार रुपये पेन्शन घेणाऱ्या निवृत्त शिक्षकांना पुन्हा जिल्हा परिषद शाळांतून सामावून घेणं म्हणजे सरकारी शाळा उद्ध्वस्त करण्याचा डाव शासनाचा आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेने सेवानिवृत्त शिक्षकांना दिलेले नियुक्ती आदेश रद्द करण्याची गरज आहे. त्याठिकाणी डीएड,बीएड, झालेल्या बेरोजगार तरुणांना शिक्षक म्हणून नियुक्ती देण्याची गरज आहे.शासनाने निर्णय रद्द न केल्यास तीव्र लढा : दिगंबर कांबळेसेवानिवृत्त शिक्षकांच्या नियुक्त शासनाने रद्द केल्या नाही तर राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शेकापचे जिल्हाध्यक्ष दिगंबर कांबळे यांनी दिला आहे.