शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

विटा नगरपरिषदेसाठी इच्छुकांचा जोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:24 IST

विटा : सांगली जिल्ह्याचे लक्ष असलेल्या विटा नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेचे विद्यमान आ. अनिल बाबर व राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते माजी ...

विटा : सांगली जिल्ह्याचे लक्ष असलेल्या विटा नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेचे विद्यमान आ. अनिल बाबर व राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते माजी आमदार अ‍ॅड. सदाशिवराव पाटील समर्थक गटाने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. अशातच आता विटा पालिकेच्या निवडणुकीत भाजप आमदार गोपीचंद पडळकर समर्थकांनी मैदानात उडी घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पालिकेची आगामी निवडणूक तिरंगी होण्याचे संकेत आहेत.

विटा नगरपरिषदेवर गेल्या अनेक वर्षापासून माजी आ. सदाशिवराव पाटील गटाची एकहाती सत्ता आहे. गेल्यावेळी शिवसेना व कॉँग्रेसमध्ये दुरंगी झाली होती. त्यावेळी मनमंदिरचे संस्थापक अशोकराव गायकवाड यांनीही अ‍ॅड. पाटील यांना ताकद दिली. अ‍ॅड. पाटील व अशोकराव गायकवाड यांच्या संयुक्त गटाला नगराध्यक्ष पद व २४ पैकी २२ जागा मिळाल्या होत्या.

सध्या राज्यात शिवसेना, कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या महाआघाडीची सत्ता आहे. परंतु, विटा पालिकेच्या निवडणुकीत महाआघाडीचा फॉर्म्युला चालणार नाही. कारण आ. बाबर हे शहरातील आपला गट शाबूत ठेवण्यासाठी निवडणुकीत पूर्ण ताकदीने उतरतील.

विटा नगरपरिषदेची यावर्षीची निवडणूक आजी-माजी आमदारांसह मनमंदिरचे अध्यक्ष अशोकराव गायकवाड, राष्ट्रवादीचे नेते व माजी नगराध्यक्ष वैभव पाटील, शिवसेनेचे जिल्हा परिषदेतील माजी उपाध्यक्ष सुहास बाबर या दोन युवा नेत्यांसाठी अत्यंत प्रतिष्ठेची होणार आहे. भाजपचे आ. गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली विटा शहरात भाजपचा गट सक्रिय झाला आहे.

गत विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे आ. बाबर यांना ताकद देणारा कॉँग्रेसचा गट विटा पालिकेच्या निवडणुकीतही आ. बाबर यांच्या पाठीशी ठाम राहण्याचे संकेत आहेत. त्यामुळे या निवडणुकीत शिवसेनेला कॉँग्रेसची ताकद मिळण्याचेही संकेत आहेत.

चौकट

दोन आमदारांच्या भूमिकेकडे लक्ष

भाजपचे आ. पडळकर यांनी विटा नगरपरिषदेची निवडणूक स्वतंत्र पॅनल देऊन ताकदीने लढविण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, गत विधानसभा निवडणुकीत युतीमुळे शिवसेनेचे आ. बाबर यांना मदत केल्याने आ. पडळकर आणि आ. बाबर हे दोन्ही आमदार पालिकेसाठी एकत्रित येतील का? असा सवालही यावेळी नागरिकांतून उपस्थित केला जात आहे. त्यामुळे या दोन्ही विद्यमान आमदारांच्या भूमिकेकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

फोटो - १९०३२०२१-विटा-आ. अनिल बाबर. यांचा फोटो वापरणे.

फोटो - १९०३२०२१-विटा-माजी आ. सदाशिवराव पाटील. यांचा फोटो वापरणे.

फोटो - १९०३२०२१-विटा-आ. गोपीचंद पडळकर. यांचा फोटो वापरणे.

फोटो - १९०३२०२१-विटा- अशोकराव गायकवाड. यांचा फोटो वापरणे.

फोटो - १९०३२०२१-विटा-वैभव पाटील. यांचा फोटो वापरणे.

फोटो - १९०३२०२१-विटा-सुहास बाबर. यांचा फोटो वापरणे.