शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
2
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
3
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
4
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
5
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
6
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
7
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
8
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
9
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
10
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
11
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
12
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
13
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
14
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
15
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
16
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
17
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
18
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
19
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
20
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान

मतदारांना भेटण्यासाठी सम्राट महाडिक यांची मुंबईत धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : शिराळा मतदारसंघातील बहुसंख्य नागरिक रोजगारासाठी मुंबईत वास्तव्यास आहेत. याची फक्त विधानसभा आणि ग्रामपंचायत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : शिराळा मतदारसंघातील बहुसंख्य नागरिक रोजगारासाठी मुंबईत वास्तव्यास आहेत. याची फक्त विधानसभा आणि ग्रामपंचायत निवडणुकीपुरतीच नेत्यांना आठवण येते. त्याच पार्श्वभूमीवर शिराळा मतदारसंघातील भाजपचे युवा नेते सम्राट महाडिक यांनी मुंबईत धडक मारली आहे. तेथील डोंगरी भागातील मुंबईत रहिवासी असणाऱ्या नागरिकांशी जवळीक साधून राजकीय ताकद वाढविण्याचा डाव आखला आहे.

इस्लामपूर-शिराळा मतदारसंघात भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष राहुल महाडिक आणि महाराष्ट्र प्रदेश भाजपचे सदस्य सम्राट महाडिक यांनी वाळवा शिराळा दूध संघाची स्थापना केली आहे. त्यानिमित्त या दोन्ही तालुक्यांसह मुंबईत सभासद नोंदणीचा कार्यक्रम सुरू केला आहे. यानिमित्ताने ते प्रत्येक गावात बैठका घेऊन संपर्क साधत आहेत. त्याला चांगला प्रतिसादही मिळत आहे. शिराळा मतदारसंघात डोंगरी भागातील मतदार शोधणे म्हणजे तारेवरची कसरत करावी लागते. प्रामुख्याने जास्त करून सत्यजित देशमुख यांचा या मतदारांशी नजीकचा संपर्क आहे. त्यानंतर आ. मानसिंगराव नाईक, माजी आमदार शिवाजीराव नाईक यांचे संपर्क नेहमीचेच आहेत. त्यामुळेच सम्राट महाडिक यांनी वाळवा, शिराळा तालुक्यातील नवी मुंबई येथे स्थायिक असलेल्या नागरिकांची बैठक घेऊन दूूध संघाच्या सभासदवाढीसाठी प्रयत्न केला. यावेळी वसंतराज को-ऑप सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी. आर. पाटील, ज्योतिर्लिंग पतसंस्थेचे अध्यक्ष बंडूशेठ पाटील, समाजसेवक कृष्णा पाटील, नगरसेवक केदार नलवडे, सुनील मोहिते, तानाजीशेठ चव्हाण, रूपेशशेठ चव्हाण, सुवर्णाताई सावंत, इंद्रजित येडेकर, सुनील मोहिते, भानुदास पाटील, शिवाजी माने, विकास सावंत, विजय गलुगडे, सतीश पाटील, श्रीराम जाधव आदींसह या परिरसरातील बहुसंख्य नागरिक या बैठकीस उपस्थित होते.

फोटो - १६०२२०२१-आयएसएलएम- राजकीय न्यूज

वाळवा, शिराळा येथील तुर्भे (मुंबई) येथे स्थायिक असलेल्या नागरिकांना मार्गदर्शन करताना सम्राट महाडिक.