शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

संविधान सन्मानासाठी एल्गार

By admin | Updated: January 18, 2017 00:18 IST

सांगलीत मोर्चा : अ‍ॅट्रॉसिटीसह विविध मागण्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

सांगली : अ‍ॅट्रॉसिटी कायदा कडक करावा, माळवाडी घटनेतील संशयितांना फाशीची शिक्षा द्यावी, यासह विविध मागण्यांसाठी मंगळवारी विविध पक्ष, संघटनांच्यावतीने सांगलीत ‘संविधान सन्मान मूक मोर्चा’ काढण्यात आला. सांगलीतील पुष्पराज चौकातून मोर्चास सुरुवात झाली. त्रिकोणी बाग, सिव्हिल हॉस्पिटल रोड, आंबेडकर चौक, झुलेलाल चौक, एसटी स्टॅँड, शिवाजी मंडई, राजवाडा चौक मार्गे मोर्चा स्टेशन चौकात आला. विविध पक्ष, संघटनांचे हजारो कार्यकर्ते निळे, पिवळे झेंडे घेऊन सहभागी झाले होते. सांगलीच्या स्टेशन चौकात मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी आंदोलनकर्त्या योगीता श्रीवास्तव म्हणाल्या की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या घटनेत कोणीही बदल करू शकत नाही. अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट रद्द करून महिलांवरील अत्याचार थांबतील, असा विचार करणे चुकीचे आहे. कोणत्याही जाती-धर्माच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्यांना फाशीचीच शिक्षा दिली पाहिजे. अशा घटनेमुळे जातीअंतर्गत तेढ निर्माण होऊ नये. समाजातील समताभाव अबाधित राहिला पाहिजे. मराठा समाजास आरक्षण देण्यासाठी आमचा पाठिंबा आहे. अन्य समाजघटकांच्याही आरक्षणाच्या मागण्या मान्य करून कोणाच्याही आरक्षणाला धक्का लावू नये. समाजातील एकोपा टिकावा, यासाठी प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षाही व्यक्त केली. प्रतीक्षा कांबळे या युवतीने निवेदन वाचन केले. त्यानंतर युवतींच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयात मागण्यांचे निवेदन सादर केले. यामध्ये योगीता श्रीवास्तव, सुश्मिता कांबळे, प्रतीक्षा कांबळे, मनीषा कांबळे, आम्रपाली कांबळे, प्रजासत्ता संघमित्र, सोनाली मोहिते, शुभांगी मोहिते, बबली घार्गे या युवती सहभागी झाल्या होत्या. आंदोलनात प्रा. सुकुमार कांबळे, नगरसेवक जगन्नाथ ठोकळे, सुरेश दुधगावकर, नानासाहेब वाघमारे, किरण कांबळे, बाबासाहेब कांबळे, विठ्ठल सोनवणे, बापू कांबळे, अशोक गायकवाड, संजय कांबळे, लालासाहेब वाघमारे, अशिष गाडे नितीन गोंधळे आदी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)फेटे, झेंडे मफलरनिळे झेंडे, निळे फेटे आणि निळे मफलर घालून आंदोलनकर्ते सहभागी झाले होते. युवतींनीही निळे फेटे परिधान केले होते. पोलिस बंदोबस्तमोर्चात हजारो लोक सहभागी झाल्यामुळे मोर्चाच्या मार्गावर ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. वाहतूक पोलिसही तैनात करण्यात आले होते. स्टेशन चौकातील वाहतुकीतही दुपारी बदल करण्यात आला. सायंकाळी चारनंतर स्टेशन रोडवरील वाहतूक पूर्ववत झाली.