शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

हाथी चले अपनी चाल, अशी राहील वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 00:20 IST

अविनाश कोळी सांगली :कुणी कितीही टीका केली, विषारी प्रचार केला तरी, ‘हाथी चले अपनी चाल’, अशापद्धतीची भूमिका मी घेतली ...

अविनाश कोळीसांगली :कुणी कितीही टीका केली, विषारी प्रचार केला तरी, ‘हाथी चले अपनी चाल’, अशापद्धतीची भूमिका मी घेतली आहे. भविष्यातही माझी वाटचाल याचपद्धतीची राहणार आहे. टीकाकारांकडे लक्ष देण्यापेक्षा जनतेची कामे करण्यास प्राधान्य राहील, असे मत संजयकाका पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.प्रश्न : इतक्या चुरशीच्या लढतीत मिळालेले विजयाचे श्रेय कोणाला द्याल?उत्तर : भाजपने म्हणजेच केंद्र व राज्य सरकारने जिल्ह्यात केलेल्या कामास ही पोहोचपावती मिळाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्याच्या विकासाकरिता दिलेल्या योगदानामुळे हा विजय मिळाला आहे. हा विजय मी जनतेच्या चरणी अर्पण करीत आहे.जातीय समीकरणांमुळे मताधिक्य घटले असे वाटते का?जातीय समीकरणांचा वापर करून अत्यंत चुकीच्या पद्धतीचे राजकारण विरोधकांनी केले. या समीकरणांना जनतेने थारा दिला नाही. त्यामुळेच चांगल्या मताधिक्याने माझा विजय झाला आहे.निवडणुकीत तुम्हाला कोणती गोष्ट सर्वात जास्त खटकली?अत्यंत खालच्या पातळीवर, विषारी प्रचार माझ्याविरोधात केला गेला. प्रचाराची ही पातळी सर्वाधिक खटकली. त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत पुढे जाणे मी पसंत केले. म्हणून जनतेने कौल दिला.भविष्यातील तुमचे संकल्प काय आहेत?सिंचनाची उर्वरित कामे पूर्ण करून दुष्काळग्रस्त भागास दिलासा देणे, उद्योग, व्यापार वाढीला चालना मिळेल, असे प्रकल्प राबविणे माझ्यादृष्टीने महत्त्वाचे आहे. पाच वर्षांत नियोजित सर्व कामे पूर्ण करण्याचा संकल्प राहील.