शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
2
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
3
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
4
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
5
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
6
आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस?
7
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई
8
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
9
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
10
"मला घाबरवलं..."; पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सल्लागाराच्या घरी बॉम्बस्फोट
11
मराठी अभिनेत्रीचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल चकित! एका वर्षात घटवलं 'इतकं' वजन; म्हणाली...
12
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
13
"अरुणाचल प्रदेश आमचा होता, आहे आणि राहणार", चीनच्या 'त्या' नापाक कृत्यावर भारताने ठणकावले!
14
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार
15
युक्रेन सोडा, आता 'या' देशावर कब्जा करण्याचा पुतिन यांचा प्लॅन; सॅटेलाईट इमेजनं सीक्रेट उघडलं
16
मुंबईच्या नालेसफाईची पोलखोल, मनसेने कार्यकर्ते साकिनाक्यातील नाल्यात उतरुन व्हॉलीबॉल खेळले!
17
'बिग बॉस' हिंदी नंतर रिजेक्शचाच सामना करावा लागला, निक्की तांबोळी म्हणाली, "त्यानंतर मी..."
18
Guru Gochar 2025: गुरु गोचरमुळे आठ वर्षात बदलणार जगाचा चेहरा मोहरा, व्हायरसचीही भीती!
19
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
20
७६६ कोटी रुपयांची कमाई तरीही रेमंडचे शेअर्स ६६% आपटले; काय आहे कारण?

ग्रामीण भागात वीजचोरी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:18 IST

सांगली : जिल्ह्यातील ग्रामीण भागात वीजचोरीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र याकडे वीज वितरण कंपनीचे दुर्लक्ष होत असल्याने वीज ...

सांगली : जिल्ह्यातील ग्रामीण भागात वीजचोरीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र याकडे वीज वितरण कंपनीचे दुर्लक्ष होत असल्याने वीज महामंडळाचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. मात्र वीजचोरीचा भुर्दंड इतर ग्राहकांना सहन करावा लागत आहे. दुर्गम व ग्रामीण भागांत कार्यक्रमांदरम्यान विजेच्या तारांवर आकडा टाकून वीजचोरी केली जात आहे.

--------------

मद्यपी वाहनचालकांकडे दुर्लक्ष

इस्लामपूर : तालुक्यात अनेक दुचाकी तसेच चारचाकी वाहनधारक मद्यप्राशन करून वाहन चालवितात. याकडे वाहतूक तसेच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी तालुक्यात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. मद्यपी वाहनचालकांवर कारवाईची मागणी हाेत आहे.

--------------

सौरदिव्यांसाठी नव्याने बॅटऱ्या उपलब्ध करा

आष्टा : वीज वाचविण्यासाठी ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायतींनी सौरदिवे लावले आहेत. मात्र यांतील बहुतांश सौरदिव्यांच्या बॅटऱ्या चोरीला गेल्या आहेत. त्यामुळे सौरदिवे केवळ शोभेच्या वस्तू बनल्या आहेत. त्यामुळे नव्याने बॅटऱ्या द्याव्यात, अशी मागणी हाेत आहे.

--------------

मोकाट जनावरांमुळे रहदारी बाधित

पलूस : शहरातील मुख्य मार्गांवर मोकाट जनावरे मधोमध उभी राहतात. त्यामुळे रहदारी बाधित होत असून, वाहनधारकांना नेहमी अपघाताची भीती असते. अनेक मार्गांवर मोकाट जनावरांमुळे वाहतूक बाधित होते. याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी हाेत आहे.

--------------

बसस्थानकावर गतिरोधक उभारा

मिरज : मिरज येथील बसस्थानकाच्या दाेन्ही बाजूंनी गतिरोधक उभारण्यात यावेत, अशी मागणी नागरिक व प्रवाशांकडून केली जात आहे. मुख्य रस्त्यावर शेकडो वाहने भरधाव वेगाने जात असतात. गतिराेधक निर्माण केल्यास वेगाने धावणाऱ्या वाहनांना आळा बसण्यास साेयीस्कर हाेणार आहे.

-----------

धाेकादायक विद्युत खांब बदला

सांगली : शहरातील काही प्रभागांत रस्त्यालगतचे विद्युत खांब गंजले आहेत. हे खांब कोसळून अपघात होण्याची भीती आहे. असे धाेकादायक खांब बदलण्याची मागणी होत आहे. जिल्हाभरात अशा प्रकारचे गंजलेले शेकडो खांब आहेत. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. मात्र या समस्येकडे कायम दुर्लक्ष होत आहे.

-----------

सांगली ते पाचवा मैल रस्त्याचे रुंदीकरण करा

सांगली : सांगली ते पलूस तालुक्यातील पाचवा मैल मार्गावर दिवसभर वाहनांची वर्दळ असते. हा रस्ता अरुंद आहे. या मार्गाची सध्या दुरवस्था झाली असल्याने दुरुस्तीसह रुंदीकरण करावे, अशी मागणी वाहनधारकांनी केली आहे.

--------------

डासांचा प्रादुर्भाव वाढला

सांगली : आरोग्य विभागाच्या वतीने गावागावांत फवारणी न झाल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. शहरातही नाल्यांची स्वच्छता नियमित हाेत नाही. यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे नागरिकांच्या आराेग्याचा प्रश्न निर्माण हाेण्याची भीती आहे.

--------------

बनावट बिलाद्वारे ग्राहकांची फसवणूक

आटपाडी : प्रत्येक ग्राहकाला जीएसटी क्रमांक असलेले बिल देणे गरजेचे असतानाही, काही अपवादात्मक दुकानदार वगळता बहुतांश दुकानदार बनावट बिल देऊन फसवणूक करीत आहेत. शहरी भागातील अनेक दुकानदार जीएसटी क्रमांक नसलेले बनावट बिल ग्राहकांना देत आहेत. यावरून अनेकदा वादावादीचे प्रकार घडत आहेत.

---------------

दिव्यांग व्यक्तींचे सर्वेक्षण करावे

सांगली : केंद्र व राज्य शासनाने दिव्यांगांच्या हितासाठी अनेक योजना तयार केल्या आहेत. मात्र, या योजनांची प्रभावी अंमलबजावणी हाेताना दिसत नाही. त्यामुळे अनेक दिव्यांग व्यक्ती शासन याेजनांपासून वंचित आहेत. प्रशासनाने दिव्यांगांचे सर्वेक्षण करून त्यांना विकास योजनांचा लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी हाेत आहे.

----------------

बिराेबा माळ परिसरात सुविधांचा अभाव

लिंगनूर : आरग (ता. मिरज) येथील बेळंकी मार्गावर असलेल्या बिराेबा माळ परिसरात नागरी सुविधांचा अभाव आहे. या ठिकाणी पाचशेवर नागरिकांचे वास्तव्य आहे. मात्र, येथील नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. प्रशासनाने येथे रस्ते, पाणी यांसह मूलभूत सुविधा उपलब्ध कराव्यात, अशी मागणी हाेत आहे.

------------------

गृहिणींचे बजेट कोलमडले

सांगली : महागाईचा आगडोंब उडाल्याने गरीब, कष्टकऱ्यांचे हाल हाेत आहेत. कोरोनाचा नोकरी, व्यवसायावर परिणाम झाला आहे. त्यातच कडधान्य, तेलाचे भाव वाढले आहेत. खाद्यतेलाच्या दरांत ३० ते ४० रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडले आहे.

------------

वाहनचालकांकडून नाराजीचा सूर

मिरज : मिरजेतून म्हैसाळ रेल्वे उड्डाणपुलापर्यंतच्या रस्त्याची दुरवस्था झाली असून, जागोजागी खड्डे पडले आहेत. खड्ड्यांतून मार्गाक्रमण करणे अवघड बनले आहे. त्यामुळे वाहनचालकांतून नाराजी व्यक्त होत आहे. वारंवार मागणी करूनसुद्धा रस्तादुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

-------------

छाेट्या व्यावसायिकांचे काेराेनामुळे हाल

कडेगाव : कोरोनाचा परिणाम सर्वच व्यवसायांवर झाला आहे. कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आलेले आहे. त्यामुळे सर्वच व्यावसायिकांचे व्यवसाय ठप्प झाले आहेत. त्यामध्ये छोट्या व्यावसायिकांचे कंबरडे मोडले आहे. त्यांना घरातच राहावे लागले आहे.