शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वीज कोसळून दोन ठार

By admin | Updated: May 12, 2017 23:51 IST

वीज कोसळून दोन ठार

लोकमत न्यूज नेटवर्कतासगाव : वडगाव (ता. तासगाव) येथे शुक्रवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास वीज कोसळून दोन शेतमजूर जागीच ठार झाले. शंकर कोंडी पाटील (वय ६०) आणि अरविंंद राजाराम बिसले (४५) अशी त्यांची नावे आहेत.शुक्रवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास तासगाव तालुक्यात विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याला सुरुवात झाली. वडगाव येथे गावापासून दीड किलोमीटर अंतरावर डोंगराच्या पायथ्याशी ओढ्यालगत झाडे तोडण्याचे काम सुरू होते. गावातील सहा शेतमजूर या कामावर होते. वादळी वारा आणि विजांचा कडकडाट सुरु झाल्यानंतर चार मजूर झाडापासून सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी बाजूला गेले, तर शंकर पाटील आणि अरविंद बिसले झाडापासून बाजूला जात असतानाच वीज कोसळली. या घटनेत दोघांचाही जागीच मृत्यू झाला. ही घटना समजताच वडगावसह परिसरातील नागरिकांनी घटनास्थळावर धाव घेतली. या घटनेची माहिती पोलिस पाटील अर्चना पाटील यांनी तासगाव पोलिसांना दिली. त्यानंतर रात्री उशिरा तासगाव पोलिसांत नोंद करण्यात आली. घरची परिस्थिती हलाकीचीवीज कोसळून ठार झालेल्या दोघाही मजुरांच्या घरची परिस्थिती हलाकीची आहे. शंकर पाटील यांच्या पश्चात पत्नी असून त्यांना मुले नाहीत. अरविंद बिसले यांच्याही घरची परिस्थिती बेताची असून त्यांच्या पश्चात पत्नी आणि शिक्षण घेणारी दोन मुले आहेत. या घटनेनंतर वडगावात हळहळ व्यक्त होत होती.चौघेजण बचावले झाडाचे तोडकाम सुरू असलेल्या ठिकाणी सहा शेतमजूर होते. वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट सुरू झाल्यानंतर यातील चौघे शेतमजूर तातडीने झाडापासून काही अंतरावर बाजूला गेले. इतक्यात झाडावर वीज कोसळली आणि झाडाखाली असलेल्या दोघांचा जागीच मृत्यू झाला. केवळ दैव बलवत्तर म्हणून इतर चार मजुरांचा प्राण बचावल्याची चर्चा घटनास्थळावर सुरू होती.