शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

बेदाणा व्यापारी संघटनेत प्रथमच निवडणुकीची चिन्हे

By admin | Updated: July 23, 2016 23:50 IST

नऊ आॅगस्टला मतदान : बिनविरोधसाठीही प्रयत्न सुरूच

सांगली : बेदाणा व्यापाऱ्यांच्या अडचणींची सोडवणूक करण्याबरोबरच बेदाणा शेतकऱ्यांनाही योग्य न्याय देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या सांगली-तासगाव बेदाणा मर्चंटस् असोसिएशनची निवडणूक जाहीर झाली आहे. सभासदांचे व शेतकऱ्यांचे हित अबाधित ठेवण्यासाठी नेहमीच अग्रेसर राहणाऱ्या या संघटनेत पंचवीस वर्षांत प्रथमच निवडणूक होत आहे, हे विशेष. या त्रैवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून, १३ जागांसाठी ३७ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. देशात बेदाण्याची अग्रेसर बाजारपेठ म्हणून सांगली आणि तासगावची ओळख आहे. या दोन्ही ठिकाणी बेदाण्याची मोठी उलाढाल होत असल्याने व्यापारी व शेतकऱ्यांनाही अनेक अडचणी येत होत्या. त्यावर उपाय काढण्याच्या दृष्टीने सांगली-तासगाव बेदाणा व्यापारी असोसिएशनची स्थापना झाली. या संघटनेमुळे बेदाण्याचे व्यवहार सुरळीत होण्यास मदत झाली होती. १६० सभासद असलेल्या या संघटनेत आत्तापर्यंत एकोप्याचे वातावरण होते. मात्र, वर्षाभरापासून मतभेदाचे वातावरण आहे. सहा महिन्यांपूर्वी संचालक मंडळाने सभासदांना विचारात न घेता बॅन कमिटी बरखास्त केल्याने सभासदांत अस्वस्थता होती. त्यामुळेच निवडणूक लागल्याची चर्चा आहे. संघटनेने आत्तापर्यंत बेदाणा व्हॅटमुक्त करण्यासाठी चांगली भूमिका पार पाडली होती. तसेच शेतकऱ्यांना वेळेवर पेमेंट देण्यासाठीही संघटनेचा पुढाकार असल्याने आजपर्यंत कधीही शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत, असे घडले नाही. हे संघटनेचे यशच म्हणावे लागणार आहे. सध्या दोन पॅनेलची जुळवाजुळव सुरू असली तरी ही व्यापारी संस्था असल्याने निवडणूक न होता बिनविरोधसाठीही प्रयत्न होणार असल्याचे समजते, मात्र इच्छुकांच्या मोठ्या संख्येमुळे निवडणूक अटळ वाटत आहे. गुरुवार, दि. २८ जुलैपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत असून, ९ आॅगस्टला मतदान व सायंकाळीच निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ज्येष्ठ व्यापारी जमनादास ठक्कर यांची निवड करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)अशी आहे प्रक्रियागुरुवार, दि. २८ जुलैपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत असून, त्यानंतरच खऱ्याअर्थाने निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. ९ आॅगस्टला तासगाव मार्केट कमिटीमध्ये मतदान, तर सायंकाळी मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येणार आहे.