शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

क्रांती कारखान्याची निवडणूक बिनविरोध

By admin | Updated: May 8, 2016 00:25 IST

कुंडलमध्ये कार्यकर्त्यांचा आनंदोत्सव : कार्यक्षेत्रातील सर्व भागाला न्याय; संचालकांचा सत्कार

कुंडल/पलूस : क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. (बापू) लाड सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत २१ जागांसाठी २१ अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी शनिवारी निवडणूक बिनविरोध झाल्याचे जाहीर केले. बिनविरोधची घोषणा होताच कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला. कारखान्याची सलग सातवी निवडणूक बिनविरोध झाली आहे. २१ जागांसाठी झालेल्या निवडणूक प्रक्रियेमध्ये बिनविरोध निवडून आलेले संचालक असे : ऊस उत्पादक गट क्र. १ अरुण गणपती लाड, रामदास कुंडलिक सावंत, संदीप बाळासाहेब पवार (सर्व कुंंडल), ऊस उत्पादक गट क्र. २ नारायण विठ्ठल पाटील (जगदाळे) (अंबक), जयप्रकाश दत्तात्रय साळुंखे (दुधोडी), आप्पासाहेब यशवंतराव जाधव (आसद), ऊस उत्पादक गट क्र. ३ सतीश नाभिराज चौगुले (बुर्ली), उमेश ऊर्फ अनंत शंकर जोशी (अंकलखोप), दिलीपराव दत्तात्रय पाटील (नागराळे), ऊस उत्पादक गट क्र. ४ भगवंत तानाजीराव पाटील (पलूस), संपतराव रामचंद्र (काका) सावंत (सावंतपूर), पोपट नारायण संकपाळ (बांबवडे), ऊस उत्पादक गट क्र. ५ अंकुश रामचंद्र यादव (रामपूर), आत्माराम विठोबा हारूगडे (आळसंद), अरुण बापूसाहेब कदम (आंधळी), सहकारी संस्था मतदार संघ महावीर बळवंत बिरनाळे (अंकलखोप), अनु, जाती, अनु. जमाती मतदार संघ (कुंडल), महिला सदस्य मतदार संघ अलका अरविंद पाटील (देवराष्ट्रे), मंगळ आप्पासाहेब पाटील (पुणदी (वा.), इतर मागास प्रवर्ग मतदारसंघ जयवंत गणपती कुंभार (कुंभारगाव), भ. वि. जाती व जमाती विशेष मागास प्रवर्ग, मतदार संघ निवृत्ती सखाराम पाटील (आमणापूर) यावेळी अरुण लाड म्हणाले की, कारखान्याच्या स्थापनेपासून क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड यांच्या विचाराने सर्वसामान्य ऊस उत्पादक शेतकरी, कामगार यांच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेऊन कारखान्याचे कामकाज काटकसरीने करून, २५०० टनावरून ५००० टन ऊस गाळप क्षमतेत वाढ केली. सहवीज निर्मिती प्रकल्प १९.७० मेगावॅट विस्तारीकरण तसेच ६० केएलपीडी क्षमतेच्या आसवनी (इथेनॉल) प्रकल्प उभारणीचे काम हाती घेतले आहे. कारखान्याने अल्पावधित केलेल्या वाटचालीस व करत असलेल्या कामाची पोहोच म्हणून सर्व सभासद यांच्या सहकार्याने कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाली. यावेळी क्रांती दूध संघाचे अध्यक्ष किरण लाड, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शरद लाड, उदय लाड, दिलीप लाड, कुंडलिक एडके, वसंत लाड, दिनकर लाड, अनिल लाड, महावीर चौगुले, आनंदराव निकम, कार्यकारी संचालक सी. एस. गव्हाणे, सचिव वसंत लाड, वित्त व्यवस्थापक शामराव जाधव, लेखाधिकारी आप्पासाहेब कोरे उपस्थित होते. (वार्ताहर)बिनविरोधची परंपराक्रांतिअग्रणी जी. डी. (बापू) लाड यांच्या मार्गदर्शनाखाली कष्टकरी, शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी १९९५ मध्ये क्रांती कारखान्याची स्थापना झाली. यानंतर सहा निवडणुका बिनविरोध झाल्या. यावर्षी म्हणजेच २०१६-१७ ते २०२१-२२ वर्षासाठीची संचालक मंडळाची सातवी निवडणूकही बिनविरोध करण्यात कारखान्याचे अध्यक्ष अरुण लाड यांना यश आले आहे. या निवडीनंतर कार्यकर्त्यांनी कुंडलमध्ये फटाक्यांची आतषबाजी करून आनंदोत्सव व्यक्त केला.