विधानपरिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले. यातून मतदारांचा विश्वास कोणावर आहे, हे सिद्ध झाले. त्यामुळे भविष्यातील निवडणुकाही आम्हाला अशाच एकीच्या जाेरावर जिंकायच्या आहेत. या तिन्ही पक्षांतील कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविणारी व प्रेरणा देणारी ही निवडणूक आहे.
- आ. मोहनराव कदम, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस
कोट
अतिआत्मविश्वास व मतदारांना गृहीत धरून चालणाऱ्या तसेच शेतकरी, कामगारांसह सर्व घटकांवर अन्याय करणाऱ्या भाजपला हा निकाल म्हणजे एक चपराक आहे. मतदारांनी राज्यातील महाविकास आघाडीच्या कामावर, त्यांच्या कार्यपद्धतीवर यातून विश्वास व्यक्त केला आहे.
- संजय विभुते, जिल्हाप्रमुख, शिवसेना
कोट
राजकारणात यश-अपयश या गोष्टी असतातच. तरीही अपयश का आले, याची कारणमीमांसा करून सुधारणा करीत आम्ही नव्या जाेमाने कार्यरत राहू. लोकहिताचे राजकारण व खिलाडूवृत्ती या गोष्टी यापुढील काळातही जपल्या जातील.
- आ. सुधीर गाडगीळ
कोट
जनतेचा कौल आम्ही प्रामाणिकपणे मान्य करतो. निवडून आलेले उमेदवार लोकांचे, संबंधित घटकांचे प्रश्न सोडवतील, अशी आशा व्यक्त करतो. निवडणुकीत निश्चितपणे चढ-उतार असतात. भाजपचे राजकारण हे देश, समाजहित आणि विकास या त्रिसूत्रीवर अवलंबून आहे. तरीही आलेल्या अपयशाची कारणे आम्ही शोधू
- मकरंद देशपांडे, संघटक, पश्चिम महाराष्ट्र, भाजप