शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

संघटित गुन्हेगारीबद्दल आठजणांवर गुन्हा

By admin | Updated: July 10, 2014 23:17 IST

कृषी साहित्याची चोरी : पोलिसांची कारवाई

विटा : कृषी साहित्यासह अन्य चोरीच्या गुन्ह्यात अटकेची कारवाई होऊनही संघटित गुन्ह्यापासून परावृत्त न झालेल्या खानापूर तालुक्यातील आठ संशयितांवर विटा पोलिसांत संघटित गुन्हेगारीप्रकरणी पुन्हा एकदा गुन्हा दाखल करण्यात आला. लहू हणमंत गुजले, नाना महादेव मंडले, सागर बाळासाहेब गुजले, पप्पू गोविंद गुजले (सर्व रा. लेंगरे), विनोद आनंदा गुजले (रा. वाळूज) यांच्यासह सिध्देश्वर शंकर तुपसौंदर्य, नितीन मल्हारी ठोंबरे व सागर दिनकर गायकवाड (सर्व रा. बलवडी खा.) या आठ जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्यावर गेल्या वर्षभरापूर्वी कृषिपंप, तांब्याच्या तारा, डिझेल व एचटीपी पंप चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यांच्याकडून चोरीतील मुद्देमालही जप्त करण्यात आला होता.दि. ९ नोव्हेंबर २०१३ च्या दरम्यान खानापूर तालुक्यातील लेंगरे, देविखिंडी परिसरातून लहू गुजले, नाना मंडले, विनोद गुजले, सागर गुजले, पप्पू गुजले यांनी डिझेल, एचटीपी पंप, ३ इलेक्ट्रीक कृषिपंप असे एकूण ६८ हजार ३७९ रूपयांचे साहित्य लंपास केले होते. त्यांना यापूर्वी अटक करून त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त केला होता. तसेच दुसऱ्या गुन्ह्यात बलवडी (खा.) परिसरात याच कालावधित सिध्देश्वर तुपसौंदर्य, नितीन ठोंबरे व सागर गायकवाड यांनी पवनचक्कीच्या तांब्याच्या तारा व इलेक्ट्रीक कृषिपंप असे एकूण २ लाख ८४ हजार रूपयांचे साहित्य लंपास केले होते. त्यांनाही अटक करून मुद्देमाल जप्त केला होता.परंतु, या चोरी प्रकरणात कारवाई होऊनही या आठजणांमध्ये कोणतीही सुधारणा झाली नाही. चोऱ्यांचे प्रकार सुरूच राहिले. त्यामुळे विटा पोलीस ठाण्याचे हवालदार महादेव खोत व विठ्ठल शेळके यांनी या आठजणांवर संघटीत गुन्हेगारीच्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला. याप्रकरणी तपास पोलीस उपनिरीक्षक एस. डी. पवार करीत आहेत. (वार्ताहर)