सांगली : जिल्ह्यात आज (मंगळवार) रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी ईदगाह मैदान तसेच विविध मशिदींमध्ये सामुदायिक नमाजपठण करण्यात आले. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मुस्लीम बांधवांना ईदनिमित्त शुभेच्छा दिल्या.मिरज : मिरज शहर व परिसरात रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली. ईदगाह मैदानावर सकाळी साडेदहा वाजता सामुदायिक नमाज पठण झाले. मौलाना महंमदगौस कादरी यांनी नमाजपठण व मौलाना महंमदगौस खतीब यांनी खुदबा पठण केले. नमाज पठणानंतर जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, पोलीस अधीक्षक दिलीप सावंत, अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. दिगंबर प्रधान, उपअधीक्षक बजरंग बनसोडे, माजी आमदार हाफिज धत्तुरे, अॅड. सी. आर. सांगलीकर, सिध्दार्थ जाधव, दयाधन सोनवणे, डॉ. महेशकुमार कांबळे, सौ. प्रतीक्षा सोनवणे, युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रा. प्रमोद इनामदार, उपाध्यक्ष महेश सलगरे, शहर अध्यक्ष साजीद पठाण, राष्ट्रसेवा दलाचे सदाशिव मगदूम, युवराज मगदूम, व्यापारी संघटनेचे गजेंद्र कुल्लोळी, मिरज विकास संघाचे अध्यक्ष जैलाब शेख, रिपाइंचे प्रकाश इनामदार यांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. शहरातील विविध मशिदीतही नमाजपठण झाले.इस्लामपूर : शहरातील मुस्लिम समाजबांधवांनी ईदगाह मैदानावर सामुदायिक नमाज पठण केले. ग्रामविकासमंत्री जयंत पाटील, पालिकेचे पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील व सर्व नगरसेवकांच्यावतीने गुलाबपुष्प देऊन मुस्लीम बांधवांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी नगराध्यक्ष सुभाष सूर्यवंशी, नगरसेवक पीरअली पुणेकर, माजी नगराध्यक्ष अॅड. चिमण डांगे, शहाजीबापू पाटील, बाळासाहेब पाटील, भगवान पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.महाडिक युवा शक्तीच्यावतीने जि. प. सदस्य सम्राट महाडिक यांच्याहस्ते मुस्लीम बांधवांना गुलाबपुष्प व पेढे देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. नगरसेवक कपिल ओसवाल यांनीही शुभेच्छा दिल्या. यावेळी सतीश महाडिक, चेतन शिंदे, विशाल शिंदे, जलाल मुल्ला, अमित ओसवाल, सनी खराडे, अॅड. फिरोज मगदूम, मुनीर इबुशे, मन्सूर वाठारकर, हुसेन खाटीक, शाहीद सुतार, संदीप माने, सुजित थोरात, रहीम दिवाण, सोमनाथ फल्ले, अॅड. फिरोज मगदूम उपस्थित होते. भाळवणी : भाळवणी (ता. खानापूर) येथे मुस्लिम समुदायाच्यावतीने रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली. मुस्लिम बांधवांनी सकाळी ८ वाजता एकत्र येऊन फेरीव्दारे नमाज टेक येथे जाऊन सामुदायिक नमाज पठाण केले. महिनाभर केलेल्या रोजाची सांगता एकमेकांना शुभेच्छा देत भेटी घेतल्या. यावेळी हिंदू बांधवानी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. पेठ : पेठ (ता. वाळवा) येथे रमजान ईदनिमित्त मुस्लिम बांधवांना आमदार मानसिंगराव नाईक यांच्याहस्ते गुलाब पुष्प व पेढे वाटून शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी राजारामबापू सूतगिरणीचे संचालक मोहनराव पाटील, प्रदीप पाटील, कृष्णा बँकेचे संचालक फिरोज ढगे, शरीफ मुल्ला, जगन्नाथ माळी, प्रताप पाटील, हेमंत देसाई, संतोष देशमाने, अरुण सातपुते उपस्थित होते. भिलवडी : मुस्लीम बांधवांनी रमजान ईद उत्साहात साजरी केली. सकाळी मशिदीमध्ये सामूहिक नमाज पठण केले. मुस्लीम बांधवांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.नांद्रे : पद्माळे, ता. मिरज येथे मुस्लीम समाजाच्यावतीने रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली. ‘चॉँदतारा’ मशिदीमध्ये सकाळी ९ वाजता मुफ्ती अबू शमा कासमी यांनी नमाजपठण केले. यावेळी मुस्लीम बांधवांना माजी सरपंच संग्रामदादा पाटील, सरपंच सुनीता कांबळे, उपसरपंच संजय जगदाळे, ग्रा. सदस्य अधिक पाटील, आप्पासाहेब जगदाळे, प्रकाश पाटील, सुनील मोरे यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी ईलाई मुल्ला, रज्जाक मुलाणी, रहिमान करीम, मौला मुलाणी, हनिफ मुलाणी, दस्तगीर मुलाणी, रमजान मुलाणी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
जिल्ह्यात ईद उत्साहात - सामुदायिक नमाज पठण
By admin | Updated: July 29, 2014 22:55 IST