कुपवाड : कुपवाडमधून अनेक राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू घडत आहेत. सध्या सराव करणाऱ्या खेळाडूंना खेळण्यासाठी क्रीडांगण उपलब्ध नाही. त्यामुळे केंद्र शासनाच्या खेलो इंडिया या माध्यमातून कुपवाडमध्ये अद्ययावत क्रीडांगण उभारण्यासाठी प्रयत्न करू, असे प्रतिपादन भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी केले.
शिवप्रेमी खो-खो क्लबमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमास महापौर गीता सुतार, भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य शेखर इनामदार, स्थायी समिती सभापती पांडुरंग कोरे, भाजप नेते मोहन व्हनखंडे, उद्योजक भालचंद्र पाटील, नगरसेवक गजानन मगदूम, शेखर माने, नगरसेवक विजय घाडगे, विनायक सिंहासने, संजय कुलकर्णी, माजी उपमहापौर प्रशांत पाटील, सहा. कामगार आयुक्त अनिल गुरव प्रमुख उपस्थित होते.
यावेळी आमदार सुधीर गाडगीळ म्हणाले की, शिवप्रेमी कला क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळाच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या खो-खो क्लबची कामगिरी कौतुकास्पद आहे. त्यामुळेच केंद्र शासनाच्या ‘खेलो इंडिया’ उपक्रमाद्वारे कुपवाड शहरात अद्ययावत क्रीडांगणासाठी प्रयत्न करणार आहे.
कार्यक्रमप्रसंगी क्लबच्या माध्यमातून यशस्वी झालेले अमोल जाधव, तोसिफ मुल्ला, ज्ञानेश्वर तोडकर, महादेव कुंभार, प्रशांत पुजारी, आदींचा सत्कार करण्यात आला. नगरसेवक गजानन मगदूम यांनी स्वागत केले. कार्यक्रमास शिवसेनेचे महादेव मगदूम, मोहन जाधव, उद्योजक रमेश आरवाडे, हणमंत सरगर, राहुल कोल्हापुरे, देवेंद्र पाटील, आदी उपस्थित होते.
फोटो : ३१ कुपवाड १
ओळ : कुपवाडमध्ये शिवप्रेमी खो-खो क्लबच्या कार्यक्रमानिमित्त आमदार सुधीर गाडगीळ यांनी मार्गदर्शन केले. यावेळी शेखर इनामदार, भालचंद्र पाटील, नगरसेवक गजानन मगदूम, शेखर माने उपस्थित होते.